नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष "हर हर महादेव" झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
अभय एक निश्चय मनासी करावा
ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
- गंगाधर मुटे
........................
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशीत. दि. १०.११.२०१०)
........................
ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रतिक्रिया
In one word... ZAKKASSS
In one word...
ZAKKASSS
रिंगटोन डाउनलोड
"नमो मायबोली" ही रिंगटोन डाउनलोड करा.
वेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB
रिंगटोन डाऊनलोड करण्यासाठी
'डाऊनलोड रिंगटोन' यावर राईट क्लिक करा आणि save link as करा.
नंतर OK select करा
सर्वांना मराठी दिनाच्या
सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जागतिक मराठी भाषा दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून जगभरातील मराठी भाषकांकडून साजरा केला जातो. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला होता.
सर्वांना जागतिक मराठी भाषा दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा...!
************************
शेतकरी तितुका एक एक!
सुंदर
सुंदर
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
शेतकरी तितुका एक एक!
पाने