कल्पनाविश्वात रमणार्या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष उद्यमीतेच्या उत्क्रांतशील वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला जखडणाऱ्या मानवनिर्मित बेड्यांची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र, अनर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाविषयीच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषि उद्योगीजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून दि. २५, २६ आणि २७, डिसेंबर २०२६ रोजी अॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा येथे तीन दिवसीय १६ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
: कार्यक्रमाची रुपरेषा :
शुक्रवार दि. २५ डिसेंबर २०२६
सकाळी ०८.३० ते ०९.३० : अल्पोपहार
सकाळी ०९.३० ते १०.०० : अग्रीम नोंदणी केलेल्या प्रतिनिधींना प्रवेश पास वितरण
सकाळी १०.०० ते ११.०० : ग्रंथ दिंडी
सकाळी ११.०० ते ०१ .०० : उद्घाटन सत्र
मराठी गौरवगीत, दीपप्रज्वलन, शेतकरी नमनगीत, उद्घाटन आणि स्वागतसमारोह
संमेलनाध्यक्ष : मा.
उदघाटक : मा.
प्रमुख पाहुणे : मा. डॉ. प्रमोद मुनघाटे, ज्येष्ठ साहित्यिक
सन्माननीय अतिथी : मा. श्रीपाद अपराजित, ज्येष्ठ पत्रकार
स्वागताध्यक्ष : मा. डॉ. मनीषा रिठे, ज्येष्ठ साहित्यिका
कार्याध्यक्ष : मा. गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष, शेतकरी साहित्य चळवळ
आयोजक : मा. डॉ. अनिलकुमार जवादे, संचालक, अॅग्रीसन FPC
संयोजक : मा. अॅड सतीश बोरुळकर, मुंबई हायकोर्ट, मुंबई
सूत्रसंचालन :
मराठी मायभाषा गौरवगीत - नमो मायभाषा जयोस्तु मराठी
शेतकरी नमनगीत : अविरत अवनीवर जो घाम गळवतो, त्या देवाला मी नमन करितो
गीत : मा. गंगाधर मुटे
संगीत संयोजन : मा. गणेश मुटे
वाद्यवृंद : ज्ञानेश पोहाणे
गायक : विवेक मुटे, तेजू कोपरकर, स्वरा पोहाणे
दुपारी ०१.०० ते ०२.०० : प्रतिनिधी स्नेहभोजन
=~०~=~०~=~०~=~०~=
सत्र - २ : दुपारी ०२.०० ते ०३.०० : परिसंवाद - १
विषय : शेती, शेतकरी आणि प्रसारमाध्यम
सत्र - ३ : दुपारी ०३.०० ते ०४.३० : शेतकरी कवी संमेलन - १
दुपारी ०४.३० ते ०५.०० : प्रतिनिधी चहापान
सत्र - ४ : सायं ०५.०० ते ०६.३० : शेतकरी कथाकथन
सत्र - ५ : सायं ०६.३० ते ०७.०० : "मी सावित्रीबाई फुले बोलतेय" एकपात्री
सत्र - ६ : रात्री ०७.०० ते ०९.०० : सांस्कृतिक कार्यक्रम : शेतकरी गीत-संगीतरजनी
पारंपरिक लोकसाहित्य, पोवाडा, ओव्या
रात्री ०९.०० ते १०.०० : प्रतिनिधी स्नेहभोजन
=~०~=~०~=~०~=~०~=
शनीवार दिनांक २६ डिसेंबर २०२६
सत्र - ७ : सकाळी ०५.०० ते ०७.०० : शेतकरी साग्रसंगीत/कराओके गीतगुंजन
पारंपरिक शेतकरी गीत, चित्रपट गीत, स्वरचित गीत
सकाळी ०७.०० ते ०७.३० : प्रतिनिधी अल्पोपहार, चहापान
सत्र - ८ : सकाळी ०७.३० ते ११ .०० : सृजकप्रभूंची शिवारफेरी
सत्र - ९ : सकाळी ११.०० ते १२.३० : शेतकरी गझल मुशायरा - १
सत्र - १० : सकाळी १२.३० ते ०१.०० : बाल काव्यवाचन (वयोगट ५ ते १० वर्ष)
दुपारी ०१.०० ते ०२.०० : प्रतिनिधी स्नेहभोजन
सत्र - ११ : दुपारी ०२.०० ते ०३.३० : परिसंवाद - २
विषय : शेतीत थांबावं की बाहेर पडावं?
सत्र - १२ : दुपारी ०३.३० ते ०४.३० : "नव्या पिढीची नवी कविता" : कवी संमेलन - २
दुपारी ०४.३० ते ०५.०० : प्रतिनिधी चहापान
सत्र - १३ : सायं ०५.०० ते ०६.०० : "स्त्रीत्वाची कविता" : कवी संमेलन - ३
सत्र - १४ : रात्री ०७.०० ते ०९.०० : सांस्कृतिक कार्यक्रम : शेतकरी गीत-संगीतरजनी
तुंबडीगीत, अभंग, गौळण, मारबत, झडत्या
रात्री ०९.०० ते १०.०० : प्रतिनिधी स्नेहभोजन
=~०~=~०~=~०~=~०~=
रविवार दिनांक २७ डिसेंबर २०२६
सत्र - १५ : सकाळी ०५.०० ते ०८.०० : शेतकरी साग्रसंगीत/कराओके गीतगुंजन
पारंपरिक शेतकरी गीत, चित्रपट गीत, स्वरचित गीत
सकाळी ०८.०० ते ०८.३० : प्रतिनिधी अल्पोपहार, चहापान
सत्र - १६ : सकाळी ०९.०० ते १०.३० : शेतकरी कवी संमेलन - ४
सत्र - १७ : सकाळी १०.३० ते ११.३० : परिसंवाद - ३
विषय : शेतीसाहित्य आणि मानसिक गुलामगिरी
सत्र - १८ : सकाळी ११.३० ते ०१.०० : शेतकरी गझल मुशायरा - २
दुपारी ०१.०० ते ०२.०० : प्रतिनिधी स्नेहभोजन
पारितोषिक वितरण आणि समारोपीय सत्र : दुपारी ०२.०० ते ०४.००
शेतकऱ्यांच्या गर्जनगीताने समारोप
=-=-=-==-=-=-==-=-=-==-=-=-=