नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
तू येतोस
फक्त मन समजवाया
चिंता मिटत नाही.
पण चिता मात्र विझल्या.
अखेरच्या श्वासापर्यंत सारेच
वाट बघत होते.
हल्ली तुलाही गाव-रान
आवडेनास झालं की काय?
शहरातल्या रंगीन झगमगाटात
भुललास आम्हाला.
वर्षे झाली, तुझा प्रतिक्षेत
कित्येक जीव विरहात
जिवाचे बरेवाईट करून बसले.
जनावरांचे हाल बघवले जात नाही.
हळूहळू गावाचे रान नि
हिरव्या रानाचं वाळवंट झालंय.
अन मालकी सुध्दा राहिली नाही कशाची
स्वातंत्र्य आहे पण
हक्कावर गदा आली.
नियत बदलली,
वर्षणा-या राजाची,
आता,जीवन जगनं खूप कठीण झालं.
नदी, नाले कोरडे
दिसते ते फक्त डोळ्यात पाणी.
दरवर्षी दिल्लीत मेघगर्जना होते
ढगं, गावठाणात, रानावनात येण्याचा
हवामान खाते इशारा देते.
पण तू मात्र इथवर पोहचत नाही.
मधेच कुठंतरी गायब होतो.
केवळ माणसं, प्राणी,पशुपक्षीच नाही
तर ही घर, शेतं, शाळा, रस्ते, पुलं,
झाड, डोंगर, नद्या नाले
सारेच तुझ्या साठी ताटकळत,
वाट बघतोय तु़झी.
आमच्या डोळ्यातले स्वप्न जन्मायचे थांबले
तुझ्यासाठी.
पावसा ,कधी येणार तू? ?????
प्रतिक्रिया
भन्नाट.
जबरदस्त, पत्र
व्वा वाह..
Narendra Gandhare
धन्यवाद! नरेंद्र भाऊ!!
खूप खूप आभार!!!!
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने