देवी गीते
पहिल्या पंगतीला ,अंबा वाडीत आली भात ,
बालाजी काय बोल ,अंबा सुरेख तुझे हाथ .
दुसऱ्या पंगतीला ,अंबा वाडीत आली वडी,
बालाजी काय बोल ,अंबा हिरवी तुझी साडी .
तिसर्या पंगतीला ,अंबा वाडीत आली पोळी ,
बालाजी काय बोली ,अंबा हिरवी तुझी चोळी .
चवथ्या पंगतीला ,अंबा वाडीत आली वडा,
बालाजी काय बोली ,अंबा हिरवा तुझा चुडा .
पाचव्या पंगतीला ,अंबा वाडीत आली गूळ,
बालाजी काय बोल ,अंबा आवर तुझा झोळ.
सहाव्या पंगतीला ,अंबा वाडीत आली शाख (आमटी )
बालाजी काय बोल ,अंबा जेवण झाल झ्याक .
सातव्या पंगतीला ,अंबा वाडीत आली दुध ,
बालाजी काय बोल ,अंबा जेवण झाल शुद्द .