जात्यवरिल ओव्या - १
पावस गावामंदी, कोण बसल पारावरी
स्वरूपानंद गुरु,गुरु वाचितो ज्ञानेश्वरी .
दत्ताच्या देवळात,कुणी लाविली तेलवात ,
स्वरुपानानाद गुरु,गुरु ध्यानस्थ मंदिरात
पावस गावामंदी ,कोण योगी ग राहतो
स्वरूपानंद गुरु ,सोहम साधना करतो
टाळ चीपळयाचा नाद ,ऐकू येतोय ठायी ठायी
गुरूची माज्या दिंडी ,आली चालत पायी पायी
पावसेचा लौकिक ,सातासमुद्रा कसा गेला
गोडबोलेंचा आप्पा ,स्वामी स्वरूपानंद झाला
जात्यवरिल ओव्या - २
गुरूच माज्या पाय ,लोण्यापरास हायत मऊ,
बाळ माज्याला किती सांगू ,चाल दर्शन दोघ घेऊ .
गुरूच माज्या पाय ,जस लोण्याच गोळ,