नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
माय
लपवीत अंगरखा फाटका
रानी बाप अनवानी नीघायचा,
घोटभर पाणी गीळुन चाललेल्या
मायकड केवीलवाणा बघायचा.(1)
देत त्याच्या पावलांना साथ
माय बी लगबग चालायची,
काम करून ऊन-वार्यात
काळ्या मातीवाणी मळायची.(2)
राती भरऊन भाकर सार्यांना
अंगाई गात नीजवायची,
अन् स्वत:च्या भुकेला
दुरडी बघुन ठरवायची.(3)
धरला अबोला वरून राजान
म्हणुन बाप आमचा हरवला,
दगड ठेऊन मायन काळजावर
ह्यो दु:खी घासबी पचवला.(4)
आता जाणल आमी
बापापेक्षा खंबीर हाय माय,
ताकद तीची आकाश झेपेची
परी जमीनीतच रूतले होते पाय.(5)
आता खोचुन पदर कंबरेला
माय रोज राबते रानात,
कष्टासंग हाय वीश्वास तीचा
की परत पीक खेळणार पाण्यात.(6)
प्रज्ञा आपेगांवकर...
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
माय
खूप छान!
धन्यवाद
पाने