नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बांध शेताचा
नीधड्या छातीवर झेलतो
खेळ ऊन पावसाचा,
जानीतो कष्ट बळीराजाचे
तो बांध माझ्या शेताचा.(1)
वाढला त्याच्या अंगाखांद्यावरी
राबता बाप दादाचा,
पीढ्यानपीढ्या तसाच खंबीर
तो बांध माझ्या शेताचा.(2)
पोसीतो कुशीत वृक्षपोरींना
बाप बनुन बोर-बाभळीचा,
नीजवे थकलेल्या जीवास
तो बांध माझ्या शेताचा.(3)
आहे साक्षीदार हा
भुमीपुत्रांच्या घामाचा,
पाहतो वाट कोंब फुटण्याची
तो बांध माझ्या शेताचा.(4)
प्रज्ञा आपेगांवकर..
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने