नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
हा कास्तकार माझा ...
दुष्काळ रोज आहे घेणार काय फाशी
आता करा गड्यानो उलटी घडी सवाशी
आहे तसा बळीचा मुद्दा जरी कळीचा
उठली कधी कुणाच्या नाकावरील माशी
जो पोसतो जगाला तो राहीला उपाशी
गेला बळी बळी तर करणार काय काशी
गेले बळी तयांची विसरू नका कहाणी
प्रत्येक लक्षुमीची होईल एक झाशी
उलटाच न्याय आहे शापीत यंत्रणेचा
खातो कुणी तुपाशी, मरतो कुणी उपाशी
हा कास्तकार माझा मातीत राबलेला
जमले कधी न त्याला कातावणे नभाशी
- बाळ पाटील, उस्मानाबाद
प्रतिक्रिया
मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
अत्यन्त कामियाब गजल
सुंदर!
सुरेख!!
हार्दिक शुभेच्छा!!!
धन्यवाद
पाने