Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




सापळे करतील फळमाशीचे नियंत्रण


सापळे करतील फळमाशीचे नियंत्रण


डॉ. युवराज शिंदे (Ph.D. कृषी कीटकशास्त्र )


मादी फळमाशी फळाच्या सालीखाली पुंजक्याळत अंडी घालते. तेथेच लहान अळ्या तयार होतात. अळ्या फळाच्या गरावर उपजीविका करतात. या किडीच्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळा वापरणे हाच चांगला पर्याय आहे.
आंब्याची वेळेत काढणी करून त्याची साठवण, तसेच बाजारात नेताना प्रत चांगली राहणे खूप महत्त्वाचे आहे. जागतिक बाजारपेठेचा विचार करता आंबा निर्यातीसाठी कीड आणि रोगरहित असणे खूप गरजेचे आहे. मागील काही दिवसांमध्ये युरोप महासंघाने भारतातील आंबा आयातीसाठी घातलेली बंदी लक्षात घेता आंब्यावरील फळमाशी किती नुकसान करू शकते, हे आपल्या लक्षात आले आहे. आंबा तसेच चिकू, पपई, सफेद जांबू, जांभूळ, बोर, केळी या फळपिकांवर फळमाशीच्या विविध जातींचा प्रादुर्भाव दिसून येतो.

अशा आहेत फळमाशीच्या जाती -
1) कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या सर्वेक्षणात ठाणे जिल्ह्यात बॅक्रोसेरा डॉर्सेलीस, बॅक्ट्रो सेरा झोनॅटा, बॅक्ट्रो सेरा करेक्टााबॅक्ट्रो सेरा टाऊ या चार जाती आढळून आल्या आहेत.
2) कारली, तोंडली, दोडले, कलिंगड, काकडी इत्यादी पिकांवर बॅक्ट्रोीसेरा कुकरबीटी ही फळमाशीची जात आढळून आली आहे.
3) या सर्व फळमाश्यांोचा जवळपास 25 ते 40 टक्के प्रादुर्भाव होत असतो.
4) फळे बाजारात किंवा विक्री अवस्थेत असताना फळमाशीचा प्रादुर्भाव दिसत असल्याने फळे विक्री करताना अडचणी येतात.

फळमाशीचा प्रादुर्भाव -
1) फळमाशी वर्षभर कमी अधिक प्रमाणात इतर फळपिकांवर उपजीविका करत असते. परंतु आंबा किंवा इतर फळांच्या हंगामामध्ये फळमाश्यांळची संख्या वाढते.
2) मादी फळमाशी तिच्या अंडनलिकेच्या साह्याने फळाच्या सालीखाली पुंजक्याअत अंडी घालते. तेथेच पांढऱ्या रंगाच्या आणि डोक्याफकडे निमुळत्या अशा लहान अळ्या तयार होतात.
3) अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फळाच्या गरावर उपजीविका करतात. त्यामुळे अशी फळे कुजतात. अळीची पूर्ण वाढ झाल्यानंतर अळ्या जमिनीत कोषावस्थेत जाते. त्यामधून फळमाशीचे प्रौढ म्हणजेच माश्याअ बाहेर येऊन पुन्हा अंडी घालतात.
4) फळमाशीने प्रादुर्भावीत फळांची गुणवत्ता कमी होते. बाजारमूल्य मिळत नाही तसेच फळे खाण्यायोग्य राहत नाही.

फळमाशीची ओळख व जीवनचक्र -
1) माशी पिवळसर सोनेरी रंगाची आणि आकाराने घर माशीपेक्षा थोडी मोठी असते.
2) अळ्या फिक्कट पांढऱ्या रंगाच्या असतात.
3) फळमाशीची एक मादी तिच्या जीवनकाळात 500 ते 1000 अंडी देते. अंडी घातल्यानंतर त्यातून 3 ते 4 दिवसांत अळ्या बाहेर येतात. अळी अवस्था 11 ते 15 दिवसांची तर कोष अवस्था 8 ते 11 दिवसांची असते. प्रौढ माशी 4 ते 5 महिने जगते. अशा प्रकारे एका वर्षात फळमाशीच्या 8 ते 10 पिढ्या पूर्ण होतात.

उपाययोजना -
किडीची अळी अवस्था ही फळाच्या आत असल्यामुळे फवारणी केलेले कोणतेही कीटकनाशक अळीपर्यंत पोचू शकत नाही. तसेच नेमक्याढ फळे काढणीच्या वेळेस या किडीचा प्रादुर्भाव होत असतो. अशा वेळेला फवारणी केल्यास ती फळे आरोग्यासाठी अपायकारक असतात. त्यामुळे या किडीच्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळा वापरणे हाच चांगला पर्याय आहे. ज्यामुळे पर्यावरण तसेच मानवी सुरक्षा राखून रासायनिक कीडनाशकांच्या खर्चात बचत करून फळमाशीचे योग्य प्रकारे नियंत्रण होऊ शकते.

रक्षक सापळा -
1) डॉ. बाळासाहेब
सावंत कोकण कृषी विद्यापीठाने हा सापळा विकसित केला आहे. या सापळ्यामध्ये एक कुपी असते. यामध्ये कापसाचा बोळ्याला मिथाईल युजेनॉल लावून ठेवता येते.
2) मिथाईल युजेनॉलच्या गंधाने नर फळमाश्याक खिडकीतून सापळ्यामध्ये येतात आणि सापळ्यामध्ये असलेल्या पाण्यात बुडून मरतात.
3) सापळ्यामध्ये दर 20 ते 22 दिवसांनी मिथाईल युजेनॉलमध्ये बुडविलेला कापसाचा नवीन बोळा ठेवावा. सापळ्यामधील मेलेल्या माश्याा काढून सापळ्याची स्वच्छता ठेवावी.
4) हे सापळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात उपलब्ध आहेत.

नौरोजी स्टोनहाऊस सापळा -
1) नवसारी (गुजरात) येथील कृषी विद्यापीठाने हा सापळा विकसित केला आहे.
2) या सापळ्यामध्ये एक प्लायवूडचा ठोकळा ठेवला जातो. फळमाशीला आकर्षित करण्यासाठी या ठोकळ्याला मिथाईल युजेनॉन/ क्यू ल्युरने तसेच कीटकनाशकाने संस्कारित केलेले असते.
3) या सापळ्यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही. सापळ्यामध्ये एकदा माशी आली म्हणजे कीटकनाशक तिच्या शरीरात जाते आणि माशी ताबडतोब मरून पडते.
4) हे सापळे नवसारी कृषी विद्यापीठात उपलब्ध होतात.

प्लॉय टी ट्रॅप -
1) फळमाशीच्या नियंत्रणासाठी काही खासगी कंपन्यांनी पिवळ्या रंगाचे गोल घुमटाकार असे सापळे विकसित केले आहेत. रक्षक सापळ्याप्रमाणे यात पाणी टाकावे लागते.
2) सापळ्यात ठेवलेल्या गंधाकडे नर माश्या आकर्षित होऊन सापळ्याच्या गोल भांड्याच्या आतल्या बाजूने आत शिरतात आणि पाण्यात बुडून मरतात. यातील पाणी वरचेवर बदलावे लागते.
3) एकदा लावलेला ल्युर (गंध गोळी) दोन महिन्यांनी बदलावी लागते.

असे होते फळमाशीचे नियंत्रण -
सापळ्यांमध्ये नर फळमाशी आकर्षित करून मारली जाते. जेणेकरून सापळे लावलेल्या भागातील नर फळमाशीचे प्रमाण कमी होते. मादी माशीला मिलनासाठी नर उपलब्ध होत नाहीत. पर्यायाने मादीपासून अफलित अंडी तयार होतात. त्यामुळे पुढील पिढी तयार होण्यास प्रतिबंध होतो. अशा प्रकारे किडींचे नियंत्रण मिळते.

सापळे लावण्याची पद्धती व प्रमाण -
फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी चार सापळे या प्रमाणात शेतामध्ये 4 ते 5 फूट किंवा पिकाच्या उंचीप्रमाणे शेतात अथवा झाडावर टांगून द्यावेत.

प्रलोभन सापळ्याचे फायदे -
1. फळमाशीचे पूर्णपणे नियंत्रण करता येते.
2. फळांचा दर्जा सुधारतो.
3. फळावर फळमाशीचा प्रादुर्भाव न झाल्याने निर्यात करण्यास अडचण येत नाही.
4. पर्यावरण तसेच आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित.
5. वाजवी किंमत असल्याने शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारा आहे.
6. शेतकरी घरच्या घरी असे सापळे तयार करू शकतात.

संपर्क – युवराज शिंदे, 9763063179

Share