
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
व्यथा शेतकरा-याची
कुडकुडणा-या थंडी मध्ये
रानात जावं लागत रे
पाणी पिकाला देताना
अनवानी फिरावं लागत रे
साप, विंचू, गोम
गारव्याला रहिवास असतो रे
कधी दंश होईल विषाचा
सांगता येत नाही रे
बिबट, डुक्कर, लांडगा
दबा धरुन असतात रे
कधी हल्ला होईल त्यांचा
वेळ काळ नसतो रे
दररोज यम दारात आमच्या
तो ही माघारी जातो रे
हाल आपेष्टा सोसून आम्ही
हातात काहीच नसतं रे
नसतं हातात काही आमच्या
सर्व निसर्ग ठरवतो रे
आलचं काही पदरामध्ये
भाव ही एसीत ठरतात रे
एसी मधून बाहेर येऊन
रानात येऊन बघ रे
सुरक्षा शिवाय एक रात्र
बांधावर घालवून बघ रे
लक्ष्मण शिंदे
सेवानिवृत्त वनाधिकारी
भोर, पुणे
७०३८९९७७६६