नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मातृत्वाचा शृंगाररस
चंदन चांदणं गोंदण ल्याली
नवथर कांती तनू सुकुमार
अर्ध मोकळ्या केसावरती
माळून गजरा चंद्राकार
कुठे निघाली चंचल रमणी
थबकत लचकत हरिणी समान
सरकत शेला सावरलेला
धरत रोखुनी नयन कमान
ठुमकत मुरडत गवळण राधा
जणू विहरत यमुनाकाठ
गोप बघुनी झाकू पाहते
पदराखाली भरला माठ
हिंदोळणाऱ्या पदरासंगे
डुचमळते बेचैन उभार
हृदय-चक्षूंना वेधून घेते
तन्मीलनाची नमनमिनार
अर्ध्या उघड्या पाठीवरती
भुरुभुरू केसांचे नर्तन
नाभी भवती करुनी रिंगण
पिंगा खेळतो द्वाड पवन
गुलाब जाई मोहित होई
रूप गोजिरे पद्मसमान
लपून आडून चोरून बघती
फुलामागुनी पिकले पान
कुणी म्हणाले शेंग चवळीची
कुणी म्हणाले पेवंदी आम
कुणी म्हणाले कामुक मैना
खुदुखुदू हसुनी रमताराम
कुण्या मुलखाची राजपरी ही
कुजबुज करती वल्लीशिवार
जशी घडविली, तशी मढवली
ही रंगीली नटवी नार
तव वदली ती प्रसन्नवदना
हो मी आहे नटवी नार
खळखळ वाहत असतो माझ्या
नसानसातुनी रस शृंगार
विरक्तीला लुब्ध कराया
करीत पीयुषाची पखरण
सजणेधजणे, लटक, मटकणे
प्रीत लालित्याची उधळण
जरी दिसतो तुम्हां दुरुनी
माझ्याठायी हा एकच रस
परी मी आहे सर्व रसांचा
जणू घुसळला अमृतरस
कधी असते मी झाशी, अहिल्या
मीच कालिकेचा अवतार
मी राधिका, मीच मीरेच्या
अद्वैत भक्तीचा एकतार
मीच कैकेयी, मी कौशल्या
मी वनवासी जनकाची लेक
मीच देवकी, मीच यशोदा
माझे स्वरूप, रूप अनेक
मीच भीमाई, मी जीजाऊ
मी क्रांतीची ज्योतमशाल
पंकामध्येही पंकजाची
पालनकर्ती मी मृणाल
आदी माया आदी शक्ती
सचेतनाची मी सृजक
जैवजिवांची उत्पत्ती अन
प्रणयरसाची मी पूजक
स्त्रित्वाची मी अभय स्वामींनी
सजीव सृष्टी माझं बाळ
ब्रह्मांडाला व्यापून उरली
माझ्या मातृत्वाची नाळ
- गंगाधर मुटे 'अभय'
==============
अठरा/दहा/चोवीस
प्रतिक्रिया
स्त्रीचे विश्व रूप दर्शन
वाह! सुरुवात शृंगार रसाचा परिपाक आणि शेवट एका तेजस्वी विचाराने.. मूळ गाभा भारी आहे.
स्त्रीचे विश्व रूप दर्शन घडवणारी कविता. स्त्रीकडे रमणी म्हणून पहायचा प्रघात आहे. त्यात वावगे काहीच नाही. मात्र तिला त्याच त्या रूपाच्या साखळदंडात कैद केले जाते, तेव्हा तिचे आत्मभान जागे करायची गरज पडते. ही कविता तो परिणाम साधून जाते. अंतर्मुख करते.
Navnath Pawar
Aurangabad, Maharshtra
श्रृंगार रसातुन विर, करुणा,
श्रृंगार रसातुन विर, करुणा, भक्ति, मातृत्व रसा कडे परावर्तीत होणार हे सर्वश्रेष्ठ काव्य अप्रतिम, विलक्षण आणि शब्दापलीकडले आहे मुटे सर . खरंच अंतरंगाचा ठाव घेणारी रचना. ... आपल्या काव्य प्रतिभेला माझा साष्टांग दंडवत.
क्या बात है संपूर्ण नऊ रसात
वाह वाह अति सुंदर विदुशकालाही
Baburao Ganpat Narote
एकदम झक्कास ... एकदम झक्कास.
Narendra Gandhare
अफाट सुंदर ,वाह ... सर
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
अप्रतिम शब्द संपदेने रंगवली..
शृंगार, , करुणा, भक्ती,
काही दिवसांपूर्वी आपण शृंगार
एकदम बेस्ट !
जय गुरूदेव
वाह गंगाधरजी, शृंगार ते
शेवटच्या दोन ओळी तर अप्रतिम!
खूप सुंदर सर!
प्रदीप बा देशमुख
सर्व सजीव सृष्टी मधील माता
सर्व सजीव सृष्टी मधील माता आणि तिचे मातृत्व हा कवितेचा केंद्रबिंदू आहे. मानवी स्त्री कवितेत केवळ त्या मातृत्वाचे प्रतिनिधित्व करते. मानवी स्त्री कवितेची नायिका असणे, कवितेची गरज म्हणून निमित्तमात्र आहे.
मातृत्व हे फक्त मानवी स्त्री पुरते मर्यादित नसते. मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात फारसा काही फरक नसतो, जवळजवळ ते एकसमानच असते.
माणूस, पशु, पक्षी, वनस्पती सहित सर्व सजीव यांच्या प्रजनन, पोषण आणि संरक्षण ह्या सर्व प्रेरणा बहुतांश प्रमाणात एकसमान आहेत.
माझे मत असे आहे की, कोणतेही मातृत्व सर्व गुण संपन्न आणि सर्व रसांनी परिपूर्ण असते. जरी एखाद्या मातृत्वातला एखादाच गुण/रस अधोरेखित होत असला किंवा ठळकपणे जाणवत असला तरी उरलेले गुण (अदृश्य स्वरूपात वगैरे) मातृत्वामध्ये असतेच, असे माझे मत आहे.
सर्व रसांनी परिपूर्ण नाही असे मातृत्व असू शकत नाही. जसे मानवी स्त्रीमध्ये स्त्रीत्व जन्मताच येते तसेच मातृत्वही उपजत असते. शृंगार ही मातृत्वाची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे कोणतेच मातृत्व शृंगारहीन असू शकत नाही.
मातृत्व हे सर्वठाई सारखेच असते. उदाहरणार्थ... कैकयीची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते तर कौशल्येची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते. व्यक्तिरेखा बदलल्या पण मातृत्व स्थायी आहे, असे माझे मत आहे.
कविता तुकड्या तुकड्यात दिसत असली तरी मुळात ती कविता मातृत्वाभोवती फिरत असल्यामुळे कविता एकजिनसी आहे. मातृत्व आणि मातृत्वाच्या प्रेरणा केंद्रबिंदू म्हणून कविता वाचली तर कविता उलगडायला फार अवघड जाऊ नये.
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण