नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
संत महिमा
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई
देव विठ्ठल बाप, राई रुक्मिणी आई
सन्याश्याची पोरं, लोक टाकिती वाळीत
भुकेलेली लेकरं, भिक्ष्या मागीती आळीत
मुक्ताबाई मांडं करी, फुटक खापर नाही घरी
ज्ञानदेव काय म्हणी, मुक्ता मांडं भाजाव पाठीवरी
च्यारी भावंडात, मुक्ताबाई ती लहान
गर्व हरून चांग्याचा, जगी झाली ती महान
मुक्ताबाई काय म्हणी, पाय दुखत्यात भारी
सोपान बंधू म्हणी , घेतो तुला मी पाठीवरी
मालुबाई
--------------------------------------------------
प्रतिक्रिया
छान वर्णन केलीय संत महिमा...
छान वर्णन केलीय संत महिमा... !
शेतकरी तितुका एक एक!
पाने