नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
लेखनस्पर्धा 23
स्पर्धेसाठी छंदोबद्ध रचना
स्वप्न
सूर्य कोपता नभीचा
तडे भुईला पडती
घाव काळजाला होता
अश्रू मोत्याचे सांडती
दूर फाकता मेघुट
पडे सावट दुष्काळी
वेडी आस कास्तकारा
डोळे लागले आभाळी
फास हातात धरून
फाळ नांगराचा चाले
काळे फोडून ढेकळं
स्वप्न उदरात घाले
मेघ गर्जून बरसे
देव नवसाला पावे
गंध दरवळे ओला
हर्ष गगनी न मावे
जोडी जुंपली ढवळी
झाली मृगात पेरणी
बीज गर्भी अंकुरता
आली खुशीत धरणी
बीजा फुटता धुमारे
रान हिरवं खुललं
डुले वाऱ्यावर पीक
मन आनंदे डुललं
अंगा लावून हळद
कशी नवरी नटली
शालू हिरवा नेसून
धरा शृंगारी सजली
धनी राबतो शिवारी
त्याचा रुबाब रांगडा
करे भविष्य उज्वल
लेकराचे तो बापडा
सुखी संसार आपुला
करू हा राजाराणीचा
दोघे मिळून प्रेमाने
खाऊ घास भाकरीचा
निशा डांगे/नायगांवकर
पुसद
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.
पाने