नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*मृदगंध*
-----------------------
पहिला पाऊस । ओलसर माती ।
दरवळे किती । मृदगंध ।।
मातीआड दाणा । कोंब उगवले ।
शिवार फुलले । चोहिकडे ।।
पक्षांनी घरटे । टांगले झाडांना ।
सांभाळी पिलांना । पंखामध्ये ।।
गाईंची वासरे । हंबरे गोठ्यात ।
चाले कुरणात । लगबग ।।
शेतकरी राजा । आनंदली काया ।
स्वप्ने फुलूनिया । मनामध्ये ।।
--- *डॉ. राजेंद्र अशोक गवळी*
कुकाणा ता. नेवासा
जि. अहमदनगर ४१४६०४
मोबा.नं. ९८८१७१६९८९
प्रतिक्रिया
छान
छान
Dr. Rajendra Gawali
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने