
|  नमस्कार !  बळीराजावर आपले स्वागत आहे. | 
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विश्वस्तरीय काव्य लेखन स्पर्धा - २०२२
स्पर्धेसाठी
काव्य प्रकार :- पद्य लेखन ( कविता )
*अन् का रे.. देवा*
आता कास्तकार भी थकला, राज्या
आत्महत्या करून...
रोज रोज कायले मारते देवा
एकदास टाकनं मारून...
     आसू सरले डोऱ्या मंदले
     रडणारं मन बी आता थकलं..
     अन् का रे देवा, तुले वावरातलं
     उभं पीक नाई दिसलं..
उभे जेथं खावाचे दाणें
वादळी पाऊस देवून झोपवतो...
ज्यायले ठेवाले जागा नाई
तेथं टोपल्यानं भरून देतो
     आमी रायलो अडाचोट
     तुवं गणित नाई समजलं..
     अन् का रे देवा, तुले
     उपाशी पोट नाई दिसलं..
जवा पायजे तवा नाई
भलत्यास येरले देते...
पेरणीचा पाऊस तुवा
कापणीच्या येरले येते...
     चुकलं कोण सजा कोणाले!
     तुनं आमाले फासात धरलं..
     अन् जीव देण्यासाठी बी
     आता कोणी नाई उरलं..
विहीर कोड्डी केली तुनं
डोऱ्यात बी नाई पाणी...
फाटलेली जीमीन पावून वाटते
मान कापल्या वाणी...
     बळी घेऊन आमचे इतके
     तुवं पोट नाई भरलं..
     अन् का रे देवा, फाटक वावर नाई दिसलं..
हावो तसे राहू दे अंधारात
ईजायनं उजेड नोको पाडू...
काट्या कुट्याची झोपडी मायी
ईज पाडून नोको जाळू...
     लई झाले उपकार तु ये
     तुनं काय काय नाई दावलं..
     आमचा हिस्सा दे त्यातले,
     ज्यायले कास्तकाराचं दुख नाई दिसलं..
अन् असं कसं रे देवा आजपातूर
कास्तकाराचं कोणालेसं काही नाई पडलं
  ✍️ कवी
सुनिल बावणे - निल
  बल्लारपूर, चंद्रपूर
  ८३०८३३४१२३
