नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
लेखन विभाग : छंद मुक्त कविता
बांधावरल्या अस्वस्थ नोंदी ...
बांधावर उभं राहून
शेतावर नजर टाकली
अन् तरळून गेलं नजरेसमोर
काय काय...
पुरानं वाहून वाकून
मोडलेलं ते बाभूळझाड ..
वाळून गेलेला
विहिरीवरचा तो कोरडा पळस ..
उभ्या बांधावर उदासपणे
उभा असलेला तो म्हातारा साग ..
नदीपात्राजवळची ती
पळसाची गर्द झाडी ..
पक्ष्यांच्या आवाजानं
भांबावून गेलेलं ते बोरबन ..
मोडक्या जाळ्यांचा आधार घेत
उभा राहिलेला तो निर्जीव मांडव ..
उभा जन्म मसाईला सावली देता देता
स्वतःच वाळून गेलेलं ते लिंबाचं झाड ..
गेल्या अनेक वर्षांपासून शेतराखण करणारी
माईची ती दगडी समाधी ..
अन् पावसाळ्यात रों रों आवाज करत धावणारी
पण नंतर कोरडी पडणारी ती पैनगंगा ..
असं काय काय अन् किती किती...
हे सारं कित्येक वर्षे
काळजात सलतेय
अन्
शेताचा बांध
ते पुन्हा पुन्हा जिवंत करतोय...
सचिन शिंदे
मुरली,उमरखेड
8421527542
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने