![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
(मतला)
देशात या असेची घडणार रोज आहे.
मनसोक्त लोकशाही रडणार रोज आहे.
(१ ला शेर)
नुकत्याच बांधलेल्या रस्त्यात पाप झाले,
खड्ड्यास बुजवताना दडणार रोज आहे.
(२ रा शेर)
काहीच मोल नाही मालास शेत्कऱ्यांच्या,
मंडीत भाव त्यांचा पडणार रोज आहे.
(३ रा शेर)
मजदूर येत नाही खैरात वाटल्याने
कल्याण हे असेही नडणार रोज आहे.
(अंतिम शेर)
देशात या इलेक्शन असतात लागलेले,
आरोप-रोष फैरी झडणार रोज आहे.
(मक़ता)
'रविपाल' सेल असुनी नाहीत नेट साक्षर,
म्हणजेच ऑनलाइन अडणार रोज आहे.
°°°
वृत्त: आनंदकन गणात्मक (गणभंग न करता)
शब्दार्थ: सेल= मोबाईल, नेट=इंटरनेट.
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
मंडित भाव त्यांचा पडणार रोज आहे
वा वा क्या बात है! डॉ साहेब, मस्त, जबरदस्त!!
वाह डॉक्टर साहेब
खड्ड्यास बुजवताना दाडणार रोज आहे...!
वाह वाह
R.A.Burbure
पाने