नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ते प्रेत बोलताहे, पाहून घ्या जरा
का त्यागले जिवाला, जाणून घ्या जरा
पैसा नसे मराया , बघुनी विवंचना
तरतूद मृत्यु कर्जा सुचवून घ्या जरा
हल्ल्यात शोषकाच्या, सुकलाय हा मळा
उरले उरात काही, शोषून घ्या जरा
पानात पुस्तकाच्या वाचू नका मला
मरणातल्या थरारा चाळून घ्या जरा
तुमच्या कृपेमुळे हो, गावात अवकळा
मग नाद हुंदक्याचा ऐकून घ्या जरा
धोरण प्रशासनाचे, फळले कुणा किती
आली किती अमीरी शोधून घ्या जरा
सन्मान शोधतांना, झाली विटंबना
अवहेलना शवांची, पचवून घ्या जरा
शोभा प्रदर्शनाला, येण्यास जर खरी
प्रतिकास या मढ्याला, रोवून घ्या जरा
वृत्त - विद्युल्लता
लगावली - गागाल गालगागा गागाल गालगा
प्रतिक्रिया
बेभान गझल
छान
Pradip
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने