नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
खेळ खेळता आभाळाचा
खेळ खेळता आभाळाचा, रूप धरले मातीचे।
सावळा गडी हरकुन गेला, नाव विसरले मातीचे।।०।।
सोन- सकाळी रात्र झाली, नितळ जीवनाची
शेतकर्यांनो सावध व्हा रे, वैभव ढळले मातीचे।।१।।
उंच भरारी घ्यावी आपण, कोणालाही वाटे।
अंतर हे तर संपत नाही, नंतर कळले मातीचे।।२।।
ज्या लोकांनी गांव सोडले, त्या लोकांनी आता।
शहरांमद्धे फ्लैट घेतले, प्रदर्शन भरले मातीचे।।३।।
नाव हे दुःखाचे कारण, नाव द्या पेटून।
नाव ठेवणार्यांनी तुमचे, कुरण चरले मातीचे।।४।।
भूक लागली असणार्यांनी, दळण दळले मातीचे।
उप- वासी झाले जेव्हा, दुःख हरले मातीचे।।५।।
कवि/रचनाकार: डॉ रविपाल भारशंकर
प्रतिक्रिया
खेळ खेळता आभाळाचा
भारशंकर सर अतिशय सुंदर गझल
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
भूक लागली असणार्यांनी, दळण
भूक लागली असणार्यांनी, दळण दळले मातीचे।
उप- वासी झाले जेव्हा, दुःख हरले मातीचे।।५।।
खूपच सुंदर !
पाने