नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
कोण भूमिका माझ्या ठायी,
उत्पादक कि विक्रेता
अर्ध्या अर्धी वाटून गेलो,
आणिक् झालो मी क्रेता //धृ//
चिमन्या पाखरं विलुप्त झाली,
माझ्या आवारातील
मातेरा हि खपतो तुमच्या,
घाऊक बाजारातील
पाखडून घ्या हाट आपले,
राखडून माझ्या प्रेता..अर्ध्या अर्धी वाटून गेलो,
आणिक् झालो मी क्रेता //१//
कोण भूमिका माझ्या ठायी..
भावणेला किंमत आली,
नाही का हो आज !
आयुष्याच्या लाटेवरती,
नीर बुडाले; बळीराज
सुख बुडाले, दुःख बुडाले,
युग बुडाले अन् त्रेता..अर्ध्या अर्धी वाटून गेलो,
आणिक् झालो मी क्रेता //२//
कोण भूमिका माझ्या ठायी..