नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
भाव देत नाही ..ती
जे व्हायचे होते अगदी तसेच झाले.
शेतमालाचे भाव खाली तसेच झाले...
तीही आली मंद पावलांनी गेली सुगी
खाण सोन्याची, हाती कोळसेचआलें...
मांडूनी कैफियत न्याय मिळतोच कां..?
सूर्य दारी पाळुनी, घरी कवडसेच आले...
खूप भाव खाते ती कधी भाव देत नाही
लोकशाहीच्या नशिबी काम वळूचेच आले...
राहीली गर्भार म्हणते 'शासन-प्रणाली '
कुंकू याचे अन् नांव दुसऱ्याचेच आले...
हे विठ्ठला मायबापा पांडुरंगा काय हे..!
कामी बळीच्या शेवटी कासरेच आले....
**********
नरेंद्र भा. गंधारे..
' एकांत '
@एम एच एक्स्प्रेस - 23 सप्टेंबर 2024.
प्रतिक्रिया
ती भाव देत नाही...
ती भाव देत नाही...
जे व्हायचे होते अगदी तसेच झाले.
शेतमालाचे भाव खाली तसेच झाले...
तीही आली मंद पावलांनी गेली सुगी
खाण सोन्याची, हाती कोळसेचआलें...
मांडूनी कैफियत न्याय मिळतोच कां..?
सूर्य दारी पाळुनी, घरी कवडसेच आले...
खूप भाव खाते ती कधी भाव देत नाही
लोकशाहीच्या नशिबी काम वळूचेच आले...
राहीली गर्भार म्हणते 'शासन-प्रणाली '
कुंकू याचे अन् नांव दुसऱ्याचेच आले...
हे विठ्ठला मायबापा पांडुरंगा काय हे..!
कामी बळीच्या शेवटी कासरेच आले....
**********
नरेंद्र भा. गंधारे..
' एकांत '
Narendra Gandhare
आपणा सर्वांचे अगदी अंतकरणातून आभार.. धन्यवाद..
Thanks BALI RAJA.COM..Y
Narendra Gandhare
रचना प्रतिसादात लिहायची नसून
शेतकरी तितुका एक एक!
पाने