नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेताच आत्मचरित्र
माणसाचं पिल्लू ते
असच निघणार होत,
उपकार विसरून सदा,
यैटीत चालणार होत.......
शेताला दूर लोटून
माणूस शहरात राहिला,
माती अंगाला लागताच
झटकून बाजूला झाला.....
काय त्याला द्याच मी कमी ठेवलं?...........
आयुष्याच्या श्वास त्याचा
मीच अंगा खांद्यावर खेळवला,
स्वतः मातीत राहून सदा,
त्याला शिकवून मोठा केला....
फुलाचा वास दिला,
पानाचा रंग दिला,
झाडाची सावली दिली,
मातीचा मृदुगंध दिला.....
मी फक्त आपल समजून
सार काही दिल त्याला,
गवताच्या पानाची शेवटची काडी,
पण सरपण म्हणून दिली त्याला....
माणूस फिरला ह्याच दुख नाही,
पण पावसाने हि आता फिरावं,
एकाचं आईची पोर आम्ही,
तरी अस पारख्यासारख वागावं.....
देणार्याने देत रहाव फक्त
आणि घेणारा घेत रहाव ,
जावूदेत ...........
जावुदेत................
माणूस हा कधीचाच फिरला,
आज काल पावूस हि फिरला,
शेताच्या मातीला ओसाड सोडून,
दूर दूर नभात जावून राहिला
.........शीतल सुर्यवंशी............
प्रतिक्रिया
छान कविता.
छान कविता.
थोडा व्याकरणाच्या आणि शुध्दलेखनाकडे लक्ष द्यावे.
मराठी टाईपिंगसाठी
http://www.baliraja.com/typehelp
येथे माहिती मिळेल.
शेतकरी तितुका एक एक!
छान लेखन झालय.
>> गवताच्या पानाची शेवटची काडी,
पण सरपण म्हणून दिली त्याला....
फारच छान.
पाने