नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शरद जोशी भारतात परत आले नसते तर. आज आम्ही कुठे असतो. आज जे शेतकरी जिव देण्याचे प्रमाण आहे ते (शरद जोशी नसते तर) कित्येक पटिने वाढले आसते. मी पण एका अतमहत्या केलेल्या शेतकऱ्यांचा मुलगा आहे जर शरद जोशीची भेट झाली नसती तर कदाचित मीही या जगाचा निरोप घेतला असता. पण माझ्या आयुष्यात शरद जोशी आले आणि माझ्या जिवणाचे सोने झाले.
राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी हे आंदोलन जगात सर्वप्रथम भारतात शरद जोशीनी सुरू केले. गावाबंदी हे शब्द सुद्धा कोणाला माहित नव्हते. शरद जोशीनी नवनवीन शब्द प्रयोगचा वापर केला.
१९८० साली शरद जोशींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शेतकरी संघटित झाला होता. पुढे सुमारे पंधरा-वीस वर्षांत शरद जोशींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात व देशपातळीवरही शेतकरी चळवळीने विविध वळणं घेतली. कोणत्याही चळवळीत अनुभवाला येणारे चढ-उतार पाहिले. काही वेळा अपयशाचंही धनी व्हावं लागलं, पण ‘शेतीमालाला रास्त भाव’ हा विषय राष्ट्रीय कार्यक्रम देशाच्या विषय पत्रिकेवर आणण्याचं श्रेय शरद जोशींच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटना या चळवळीला अपरिहार्यपणे जातं.
१९७६ मध्ये शरद जोशी परदेशातलीमोठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून ते भारतात परतले. पुण्याजवळ आंबेठाण इथे कोरडवाहु शेती खरेदी करून शेतीतल्या अर्थशास्त्राचे प्रयोग सुरू झाले. वेगवेगळ्या प्रकारच्या साधनसामग्रीचा वापर करूनही शेती तोटय़ातच राहते, कारण शेतीमालाला उत्पादनावर आधारित रास्त दर देण्याची व्यवस्था इथे नाही, या भूमिकेला त्या प्रयोगांमधून पुष्टी मिळाली. मग हे तत्त्वज्ञान आजुबाजुचया सामान्य, अडाणी, शेतकऱ्यांना समजावून सांगण्याची धडपड सुरू झाली. त्यातून शेतकरी संघटित होत गेला आणि एक दिवस पुणे-नाशिक रस्त्यावर चाकणच्या शेतकऱ्यांनी बैठक मारून रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. या नविन अराजकीय शेतकरी आंदोलनाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यापाठोपाठ झालेल्या नाशिक जिल्हय़ातल्या ऊस आंदोलनाने या चळवळीच्या भावी वाटचालीची दिशा स्पष्ट झाली होती.
शरद जोशी यांनी आंदोलनास आíथक हत्यारांची जोड दिली. शेतकऱ्याने माल पिकवला, पण बाजारात आणलाच नाही तर काय होते हे खासकरून ग्राहक असलेल्या वर्गास त्या वेळी समजले. सुरुवात झाली कांद्यासारख्या दुर्लक्षित पिकाने. नंतर त्यांनी उसास हात घातला आणि मग कापूस. या तीनही पिकांत महाराष्ट्र आघाडीवर आहे. ही सर्व आंदोलने अत्यंत नावीन्यपूर्ण होती. विठोबाला साकडे, ठिय्या, पान फूल आंदोलन रस्ता रोको रेल्वे रोको आदी अनेक नवनवे प्रयोग शरद जोशी यांनी केले. आंदोलनाच्या स्वरूपावरून त्याची बुद्धी किती ताकदीची होती हे दिसून येते.जिंदाबाद मुर्दाबादच्या निर्बुद्ध घोषणा आणि दगडफेक अशा आंदोलनांना अक्कल लागत नाही. पण शरद जोशी यांनी केलेली सर्व आंदोलने अत्यंत चमकदार होती. शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमुक्तीचे आंदोलन छेडले. ‘‘शेतीमालाला योग्य तो बाजारभाव मिळू द्यायचा नाही आणि शेतकरी कर्जबाजारीच राहील अशीच व्यवस्था करायची हेच सरकारचे धोरण असते, शेतकऱ्यांची सर्वच कर्जे अनतिक आणि बेकायदेशीर ठरतात, त्यामुळे ती रद्दच व्हायला हवीत,’’ असा त्यांचा युक्तिवाद होता. शरद जोशीनी तो पटवून दिला होता.
शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेचे जे नेतृत्व केले, याला अनेक अर्थानी ऐतिहासिक महत्त्व आहे. ते महत्त्व या अर्थाने की, शेतकरी, कष्टकरी हा बहुजन समाजातला. अशा बहुजन समाजातील शेतकऱ्यांचे नेतृत्व तेही एका ब्राह्मणाकडे होते हे भारतात प्रथमच असे घडले आहे.
शेतकरी संघटनेचा बिल्ला छातीवर लावणं अभिमानची गोष्ट वाटू लागली . एक आवाज दिला की हजारो शेतकऱ्यांनी एकत्र यावं हे महाराष्ट्रात प्रथमच घडत होते . चक्काजाम किंवा रास्ता रोको आंदोलनाचे दोन नवे शब्द महाराष्ट्रात नवीन रुढ झाले. संघटनेने चक्काजामचा इशारा दिला की काही तासात रस्त्याच्या कडेची हजारो झाडे रस्त्यावर येऊन पडायची. वाहतूक ठप्प व्हायची. बंद म्हणजे बंदच. असे अनेक आंदोलने मी अनुभवले.
पण अपयश आपल्या वाटयाला येणार हे माहिती असून देखील शरद जोशीनी तन,मन वा धान या तिन्ही गोष्टी एकत्र करून शेतकऱ्यांच्या साठी कार्य केले. शेतकरी संघटनेचा झेंडा उंचावणारे हजारो कार्यकर्ते हा संघटनेची संपत्ती आहे. शरद जोशींनी घर विकले, मालमत्ता विकली अर्थशास्त्राच्या दृष्टीने त्यांचा ताळेबंद तुटीचाच आहे शेतकऱ्यांसारखा ! मात्र शेकडो शेतकऱ्यांचे प्रेम, आदर, सन्मान जो त्यांनी कमावला, तो भारतात तरी कुठल्याही पक्षाच्या नेतृत्वाला मिळाला नाही
जर शरद जोशी भारतात परत आले नसते तर हे सर्व शेतकऱ्यांसाठीचे आंदोलने कोणी केले असते शेतीच्या लुटीचे अर्थशास्त्र कोणी समजाऊन सांगितले आसते. ??
प्रतिक्रिया
आमचे बाबा सांगायचे १९७६ ता काळ...! खुप छान अभ्यासपुर्ण लेखन
सर्व शेतकरी बापाकडुन शरदकाका जोशींना समर्पित माझ्या तुटक्या फुटक्या ओळी...
खिपल्या पडल्या डोळ्याला,
काळजाला भेगा रे...!
शासनाची धोरणं परकी,
आता तुच आमचा सगा रे..!
~ रमेश बुरबुरे,यवतमाळ
R.A.Burbure
संघर्षपुर्ण अनुभव तुमचा
संघर्षपुर्ण अनुभव तुमचा रामेश्वर साहेब,आज तुमच्या सारख्या सकारात्मक विचाराची प्रत्येकाला गरज आहे.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने