Main page content
क्षण एक पुरे जगण्यास खरा : पुण्यनगरी दीपावली विशेषांक २०११
.
.
जगणे कसले शतवर्ष नरा?
क्षण एक पुरे जगण्यास खरा
लपवून व्यथा रडतोय मनी
दिसतोच सदा मुखडा हसरा
जगणेच नको असले तसले
परसात पडून जणू कचरा
मरणास इथे नच घाबरतो
असते जगणेच कठीण जरा
श्रमतो, दमतो, शिणतो पुरता
परिहार जणू जुळता नजरा
दिसतात इथे जन सज्जन हे
अपुलाच स्वभाव नसेल बरा
- Read more about क्षण एक पुरे जगण्यास खरा : पुण्यनगरी दीपावली विशेषांक २०११
- Log in or register to post comments
- 8385 views
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?
परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे
कधी भाट होई सख्या चेहर्यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे?
"घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
- Read more about मी मराठी - स्पर्धा विजेती गझल
- 12 comments
- Log in or register to post comments
- 37041 views
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।।
हाण त्याच्या टाळक्यात
नागपुरी तडका ।।९।।
ऊठ मर्दा ऊठ
आवळून घे मूठ
हाण त्याच्या टाळक्यात
पायामधला बूट
सत्तेपुढे शहाणपण
जेव्हा व्यर्थ जाते
माणुसकीचे लचके तोडून
लाचखोर खाते
पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
- Read more about हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।।
- 12 comments
- Log in or register to post comments
- 46336 views
होतकरू झाड

मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा कठीण मातीत रूजणार्या, नव्या बियांची नवीन भाषा नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे कठोर पाषाण भेदणार्या, नव्या मुळांची नवीन भाषा
- Read more about होतकरू झाड
- 1 comment
- Log in or register to post comments
- 15233 views
पांढरा किडा
तुझी सांग येथे दखल कोण घेतो
कशाला घशाला उगा त्रास देतो
असामान्य विश्लेषकांच्या भितीने
गझल घप्प कपड्यात झाकून नेतो
नवे रोप लावत पुढे चालताना
कुणी सांड मागून तुडवीत येतो
पिके फस्त केली फळे पोखरूनी
कुठूनी किडा पांढरा जन्म घेतो
अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी
कुणाच्याच बापास ना घाबरे तो
- Read more about पांढरा किडा
- 2 comments
- Log in or register to post comments
- 15640 views
नेते नरमले
मोठे गरजले
रेती वाहतच
मते पाहताच
ललना पाहून
- Read more about नेते नरमले
- Log in or register to post comments
- 6296 views
संवाद - ईटीव्ही - शरद जोशी
मे २०१० मध्ये ई टीव्ही मराठी वाहिनीच्या संवाद या कार्यक्रमात राजू परूळेकर यांनी मा.शरद जोशी यांची घेतलेली मुलाखत प्रसारीत झाली.
त्या कार्यक्रमाची रेकॉर्डेड चित्रफित
संवाद - भाग १
.................................
संवाद - भाग २
.................................
संवाद - भाग ३
- Read more about संवाद - ईटीव्ही - शरद जोशी
- 4 comments
- Log in or register to post comments
- 19674 views
विनोदी VDO
अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू…..!!
- Read more about अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू…..!!
- Log in or register to post comments
- 7629 views
शोध
सदस्य प्रवेश
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 9 *
Who's new नवीन सदस्य
आज सर्वाधिक वाचन
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| वांगे अमर रहे...! | 45,504 |
| नियमावली | 44,810 |
| पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ | 44,147 |
| What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi | 41,820 |
| मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा | 41,725 |
| शरद जोशी | 40,736 |
| “माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ | 39,108 |
| शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे | 39,057 |
| संपर्क/सुचना/अभिप्राय | 38,543 |
| ४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन | 37,043 |
| मी मराठी - स्पर्धा विजेती गझल | 37,041 |
| माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. | 36,796 |
| गरीबी कशामुळे? | 36,065 |
| बरं झाल देवा बाप्पा...!! | 34,610 |
| आईचं छप्पर ।।१०।। | 34,519 |
| पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। | 33,857 |
| रे नववर्षा | 33,746 |
| शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन | 33,295 |
| श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ | 32,271 |
| पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका | 32,264 |

Recent comments ताजे प्रतिसाद