नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
रान-वीस्तव.
बनला रानाचा वीस्तव
झाला पोरका नांगर,
फक्त घोट गीळुन पाण्याचा
सुरू आहे रात्रीचा जागर.(1)
दुरावल दप्तर पोरांच
अंगास पुरते कापड नाही,
लक्ष्मीरूपी आलेल्या बायकोजवळ पीवळा मनी ऊरला नाही.(2)
ना कोंब फुटण्याची आता
उम्मीद या रानात,
कीती साल असच सरायच
उरला ना धीर मनात.(3)
क्षणाक्षणाच्या मरनात
आता कुटवर जगायच,
का औषध घेऊन सार्यांनी
कायमच नीजायच.(4)
प्रज्ञा आपेगांवकर..
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने