नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६*
२] पद्यलेखन स्पर्धा-२०१६
विभाग : ब) छंदमुक्त कविता
नकोश्या गोष्टी
शेतक-यांचे जगणे कळणे इतके सोपे नाही,
आम्हा शहरातील माणसांना!
वातानुकूलित माॅलमधून येतो भाजीपाला,
गाडीतून फ्रिजपर्यंत.
तेव्हा त्यावर मातीचा अंशही नसतो.
तसंही चकचकीत, गुळगुळीत लादीवरुन चालणारे आम्ही,
नसतेच आम्हाला काही मातीशी घेणे-देणे!
पाऊस पडो वा ना पडो,
आमचे शाॅवर अखंड चालूच असतात.
अन्नधान्य महाग झाली तरी खाण्यापेक्षा जास्त वाया घालवणे चालूच असते.
फक्त....
शेतकरी जेव्हा लटकतो निष्पर्ण झाडावर दुष्काळग्रस्त होऊन वा पाण्यात बुडतो;
तेव्हा ती बातमी आम्ही पाहतो सोफ्यावर रेलून!
पण...... परत परत तीच बातमी दिसू लागते सर्व चॅनेल्सवर,
फेसबूक, ट्विटर, व्हाॅट्सअॅपवर नि वर्तमानपत्रातही,
तेव्हा मात्र चिडून आम्ही म्हणतो -
किती व्हायरल होतात नकोश्या गोष्टी!
इतकाच काय तो संबध असतो आमचा शेतक-यांशी!
प्रा. प्रतिभा सराफ
(अप्रकाशित कविता)
इ-1503, रुनवाल सेंटर,
गोवंडी स्टेशन रोड, देवनार,
मुंबई 400088
महाराष्ट्र
भारत
संपर्क: 9892532795
E-mail: pratibha.saraph@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने