नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
प्रगल्भ नेता...
सोडुन मिथ्या ईश्वरवाद
नांगर हाती धरला
एक ब्राम्हणाचा पोर
असा शेतीमधे शिरला॥
भिकेच्या अन मदतीच्या प्रकल्पातून
गरीबीचा प्रश्न सुटत नाही
अंग मोडून शेत कसाया
बेगडी भूमीहीन उठत नाही॥
स्त्री सन्मानाची राखाया बूज
नवी पहाट उजाडली
खर्या शेतकरणीला द्याया न्याय
'लक्ष्मीमुक्ती' घडवून आणली॥
विखुरलेले शेतकरी
त्यांनी एक केले
असे शेतकर्यांचे प्रगल्भ नेते
शरद जोशी झाले॥
--- विनिता माने - पिसाळ
पुणे - ४११०४४
प्रतिक्रिया
सुंदर
सुंदर विनिताजी.
पाने