नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
नमन श्रमदेवाला...!
अविरत अवनीवर जो घाम गळवतो
त्या देवाला मी नमन करितो
त्या देवीला मी नमन करितो
श्रमदेवीला मी नमन करितो
श्रमदेवाला मी नमन करितो
जो अवनीवरती घाम गळवतो ।।
खांदी नांगर हाती न्याहारी
मनपटलावर स्वप्नं रूपेरी
नाही कंदील, नाही विजेरी
भल्या पहाटे निघते स्वारी
नितादिन अवनीस जो घास भरवतो
त्या देवाला मी नमन करितो ।।
बाळ चिमुकले पाठीवरती
सरपण मोळी डोईवरती
पदर खोचून कमरेभवती
गायवासरू हाकत पुढती
घागर-विळा खांदे सजवतो
त्या देवीला मी नमन करितो ।।
मांजरझाकट वा रामप्रहरी
पाऊस, थंडी, उन्हं दुपारी
वेळी-अवेळी जित्रूप चारी
जागलखोपा सजवी शिवारी
अभय अविचल जो अन्न पिकवतो
त्या देवाला मी नमन करितो ।।
- गंगाधर मुटे ’अभय’
-----------------------------------------
प्रतिक्रिया
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/2176637235694286
शेतकरी तितुका एक एक!
मस्त
मस्त
पाने