नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
रगताच्या धारा...!!
काळ-कुट्ट झालं ढग , काळ्या आवसेच्या परी ,
लाल रगाताच्या धारा , नाही अमृताच्या सरी |
पिकं ज्वानीत आलेलं , जागोजागी भरलेलं ,
तोंडा आलेला हा घास , पर इपरीत झालं |
आसं निष्ठुरलं मन , तुझं का रं पांडुरंगा..?
घास घेतला काढून , थंडी वाजते रे अंगा |
उभं पिक माझं बापा , आज आडवं पडलं ,
उभारल्या सपनाचं , जणू शरीर सडलं |
मह्या तान्हुल्या पोराला,येतं आज लई हासू ,
उद्या पडलं उपास , डोळं त्याचं कसं पुसू ..?
मह्यापुढं शिरीरंगा भूक वसते थोबाड ,
काय घालू सांग तिला , मला करी ती लबाड |
होतं सपन रे माझं , औंदा फेडीन नवस ,
परं कोपामुळ तुह्या , आता घडती उपास |
मह्या आसवाचा देवा , कसा बांधू मी रं भारा ?
नसे गाराचा पाऊस , होत्या रगाताच्या धारा...!!
दिलीप वि.चारठाणकर
सेलू [ परभणी ]
प्रतिक्रिया
रगताच्या धारा...!!
धारदार शब्द!
हेमंत साळुंके
पाने