Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ

''वांगे अमर रहे’ प्रकाशन समारंभ

          'योद्धा शेतकरी' (www.sharadjoshi.in) या संकेतस्थळाचा विमोचन समारंभ आणि गंगाधर मुटे लिखित "वांगे अमर रहे" या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ वर्धा येथील गुजराती भवनात दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता संपन्न झाला. संकेतस्थळाचे उद्घाटन पी.टी.आय या वृत्तसंस्थेचे व नवभारत टाईम्सचे माजी अध्यक्ष मा. वेदप्रतापजी वैदीक यांचे हस्ते तर "वांगे अमर रहे" पुस्तकाचे प्रकाशन शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांचे हस्ते, लोकमत, नागपूरचे संपादक मा. सुरेश व्दादशीवार यांचे अध्यक्षतेखाली पार पडले.
      व्यासपिठावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वभापचे अध्यक्ष, माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप, माजी आमदार आणि स्वभापच्या अध्यक्षा सौ. सरोज काशीकर, शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ. शैलजा देशपांडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, स्वभापचे जिल्हाध्यक्ष मधुसूदन हरणे, अ‍ॅड दिनेश शर्मा, डॉ. मानवेंद्र काचोळे, अनिल घनवट, गुणवंत पाटील, राम नेवले, अंजली पातुरकर व अन्य पदाधिकारी हजर होते.

**** वर्तमानपत्रातील वृत्त ****

महाराष्ट्र टाईम्स

आजच्या भ्रष्टाचारास नेहरूंचा समाजवादच जबाबदार- जोशी

म. टा. प्रतिनिधी , वर्धा
 
          भ्रष्टाचार हे दुधारी हत्यार आहे. एका लोकपाल विधायकाने हा भ्रष्टाचार एक टक्काही कमी होणार नाही. आजच्या भ्रष्टाचारास नेहरूंचा समाजवादच जबाबदार आहे. त्यांनी सुरू केलेले लायसन्स , परमिट राज हेच याचे मूळ आहे , अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केले. शहरातील गुजराथी भवनात रविवारी आयोजित शेतकरी संघटनेच्या संकेतस्थळाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
 
          यावेळी मंचावर ज्येष्ठ पत्रकार वेदप्रकाश वेदिक , सुरेश द्वादशीवार , रवी देवांग आणि संकेतस्थळाचे निर्माते गंगाधर मुटे उपस्थित होते. यावेळी वेदप्रकाश वेदिक म्हणाले , आज देशातील दहा कोटी लोकांच्या मनात भ्रष्टाचाराविरोधात उठावाची लाट निर्माण झाली तर सत्तापरिवर्तन होऊ शकते. हे मतांनी नव्हे तर मनानी व्हायला पाहिजे. म्हणून लोकाच्या मनावर राज्य करण्याची लहर आली पाहिजे. आता ते दिवस आले आहेत. हे अलीकडील काही जनआंदोलनातून सिद्ध होते. या आंदोलनाच्या नेत्यांना मात्र राजकीय पक्ष काढून सत्तेत येण्याची घाई झालेली दिसते. नेमकी येथेच ही आंदोलने फसतात. जोशींनीही हा अनुभव घेतला आहे , असेही वेदिक म्हणाले. सुरेश द्वादशीवार म्हणाले , आंदोलनांना विचारांची शक्ती असेल तरच ती उभी होतात. पुढे जातात नाहीतर सोमवारी सुरू झालेले आंदोलन शुक्रवारी दिसत नाही. शरद जोशींच्या शेतकरी आंदोलनाला प्रचंड वैचारिक बळ असल्यानेच ते मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले.
          शेतकरी संघटनेची www.sharadjoshi.in अर्थात ' योद्धा शेतकरी ' या वेबसाईटचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आले. याप्रसंगी कवी व वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर मुटे यांच्या ' वांगे अमर रहे ' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. संचालन पांडुरंग भालशंकर यांनी केले.
*

लोकमत

शेतीवर पोट असणार्‍यांनाच शेतकर्‍यांच्या वेदना कळतात - शरद जोशी

 
वर्धा। दि. २२ (शहर प्रतिनिधी)
         भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जाते. मात्र याच देशातील शेतकर्‍यांची दैनावस्था आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी लढण्याचा आव आणणारे अनेक नेते मंडळी आहे. पण ते अद्यापही शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ शकले नाही. कारण त्यांना शेतकर्‍यांच्या समस्या कळल्याच नाही. ज्या नेत्याचे वा कार्यकर्त्यांचे पोट शेती व्यवसायावर असेल त्यांनाच शेतकर्‍यांच्या खर्‍या वेदना कळतात, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी केले.
स्थानिक गुजराती भवन येथे शेतकरी संघटनेच्या वतीने योद्धा शेतकरी या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
            या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून पि.टी.आय.चे माजी अध्यक्ष वेदप्रताप वैदीक तर अध्यक्षस्थानी लोकमतचे संपादक प्रा.सुरेश द्वादशीवार उपस्थित होते. या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामन चटप, स्वतंत्र भारत पक्ष महिला आघाडीच्या अध्यक्षा सरोज काशीकर, शेतकरी संघटना महिला आघाडी अध्यक्षा शैलेजा देशपांडे, अंजना पाथुरकर, दिनेश शर्मा, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, स्वभाप जिल्हाध्यक्ष मधुसूदन हरणे आदी मंचावर उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून या उद्घाटन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरोज काशीकर यांनी केले. जिल्हाध्यक्ष मुटे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या योद्धा शेतकरी संकेतस्थळाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुटे लिखित वांगे अमर रहे या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
           सर्व कार्यकर्त्यांनी हे संकेतस्थळ चालविण्यासाठी मदत करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. द्वादशीवार यांनी शरीराने थकलेल्या पण विचाराने अजूनही तरूण असलेल्या शेतकरी नेत्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी शेतकर्‍यांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी स्विकारावी असे सांगितले. येत्या ९ ऑगस्टला संघटनेचे कार्यकर्ते नव्या जोमाने शेतकर्‍यांच्या हक्काच्या लढाईसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग यांनी दिली. पटर्वधन यांच्या बासरी वादनातून वैष्णव जन तो या गिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
*
सकाळ

शेतकर्‍यांसाठी शरद जोशींनी उभारलेला लढा महत्त्वाचा

पत्रकार वैदिक : ’योद्धा शेतकरी’ संकेतस्थळाचे उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा
वर्धा,ता २२:                    

              शेतकर्‍यांकरिता शरद जोशींनी उभा केलेला लढा महत्त्वाचा आहे. त्यांचे मौलिक विचार येणार्‍या काळातही दिशादर्शक ठरतील, असा विश्वास जेष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदीक (दिल्ली) यांनी श्री. जोशी यांच्या समग्र जीवनकार्य़ावरील ’योद्धा शेतकरी’ संकेतस्थळाच्‍या येथील उद्घाटन कार्य़क्रमात व्यक्त केला.                    
          येथील गुजरात भवनाच्या सभागृहात आज उद्घाटन समारंभ पार पडला. कार्य़क्रमाला शेतकरी संघट्नेचे सर्वेसर्वा शरद जोशी, जेष्ठ पत्रकार सुरेश व्दादशीवार, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामनराव चटप, स्वभापच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सरोज काशीकर, शेतकरी संघटनेच्या महीला आघाडीच्य़ा अध्यक्ष शैलजा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संकेतस्थळावर शेतकरी सघंटनेची विविध आंदोलने, छायाचित्र, त्यावरील वृत्तांत, शरद जोशींनी लिहीलेली १७ मराठी, तीन इंग्रजी आणि दोन हिंदी पुस्तके, राज्यसभेतील त्यांची भाषणे, जीवन परिचय आदींचा समावेश आहे
          यावेळी संघटनेचे पदाधिकारी गंगाधर मुटे यांच्या "वांगे अमर रहे" या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात श्री. मुटे यांनी मागील दोन वर्षात लिहिलेल्या वैचारिक लेख, कथा, ललीत लेखनाचे संकलन आहे.                     
            पुढे बोलताना श्री. वैदीक म्हणाले, ’योद्धा शेतकरी’ हे संकेतस्थळ आपण इंग्रजी आणि हिंदी मध्ये सुरू केले. त्यांचा क्रम आधी मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा असायला हवा होता. सध्या देशात भ्रष्टाचाराच्या काहूर माजले आहे. भ्रष्टाचारावर लगाम लावण्याकरिता कठोर पावले उचलण्यात आली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.                    
             यावेळी विविध मान्यवरांनी विचार व्यक्त केले. संचालन पांडुरंग भालशंकर यांनी केले. प्रास्तविक सरोज काशीकर यांनी केले. शैलजा देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

*
लोकशाही वार्ता

शेतीवर पोट असलेले नेतेच शेतकर्‍यांसाठी लढतात

प्रतिनिधी/ २२ जुलै
                   वर्धा : भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते मात्र याच देशातील शेतकर्‍याची दैनावस्था आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी लढण्याचा आव आणणारे अनेक नेते मंडळी आहे. पण ते अद्यापही शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ शकले नाही. कारण त्यांना शेतकर्‍यांच्या समस्या कळल्याच नाही. ज्या नेत्याचे वा कार्यकर्त्यांचे पोट हे शेती व्यवसायावर भरत असेल त्यांनाच शेतकर्‍यांच्या खर्‍या वेदना कळतात, समस्येची जाणीव असते आणि तेच शेतकर्‍यांच्या न्यायासाठी पोटतिडकीने भाग घेऊन लढतात, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी केले.
              स्थानिक गुजराती भवनात शेतकरी संघटनेच्या वतीने वर्धा जिल्हाध्यक्ष मुटे यांच्या पुढाकाराने 'योद्धा शेतकरी' या संकेतस्थळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ पत्रकार पी.टी. आय चे माजी अध्यक्ष वेदप्रतापजी वैदिक तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश व्दादशीवार उपस्थित होते.
              शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामन चटप, महिला आघाडी स्वभाप अध्यक्षा सरोज काशीकर, शेतकरी संघटना महिला आघाडी अध्यक्षा शैलेजा देशपांडे, अंजना पाथुरकर, दिनेश शर्मा, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, स्वभाप जिल्हाध्यक्ष मधुसूदण हरणे यांची उपस्थिती होती. प्रास्तविक सरोज काशीकर यांनी केले. जिल्हाध्यक्ष मुटे यांच्या प्रयत्नातून फळाला गेलेल्या योद्धा शेतकरी संकेतस्थळाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुटे लिखित 'वांगे अमर रहे' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. उद््घाटनीय भाषणातून महाराष्ट्राच्या भूमीत शरद जोशीसारखे शेतकरी नेते निर्माण होणे म्हणजे अहोभाग्य असल्याचे वैदिक यांनी सांगितले. तर प्रणेते शरद जोशी यांनी या संकेतस्थळाची कल्पना पूर्वीपासूनच मनात होती परंतु काही कारणास्तव पूर्ण होऊ शकली नाही म्हणूनच शेतकरी संघटनेला व नेत्यांना इतर नेत्यांप्रमाणे महत्त्व प्राप्त झाले नाही. ही संकेतस्थळाची इच्छा मुटे यांनी पूर्णत्वास नेल्याने शेतकरी संघटनेला नवी भरारी मिळाली आहे. यामुळे त्यांनी मुटे यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी हे संकेतस्थळ चालविण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ संपादक सुरेश व्दादशीवार यांनी शरीराने थकलेल्या पण विचाराने अजूनही तरुण असलेल्या शेतकरी नेत्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी शेतकर्‍यांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी स्वीकारावी असे सांगितले. तसेच या संकेतस्थळाने शेतकरी संघटना व तिचे कार्य हे सर्वदुर पसरणार असल्याने सध्या आलेली मरगळ झटकुन शेतकरी संघटनेने पुन्हा नव्याने उभारी घेण्याची गरज व्यक्त केली. शरीराने थकलेल्या पण मनाने आणि विचाराने तरूण असलेल्या नेत्याला आराम देऊन केवळ त्यांच्या मार्गावर कार्यकर्त्यांनी वाटचाल करावी असे सांगितले. येत्या ९ ऑगस्टला हजारोंच्या संख्येने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी छातीवर संघटनेचा लाल बिल्ला लाऊन पुन्हा नव्या जोमाने शेतकर्‍यांच्या हक्काच्या लढाईसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग यांनी दिली. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित झाले होते. पटवर्धन यांच्या बासरी वादनातून 'वैष्णव जन तो तेने कहीए जे पीर परायी जाने रे' या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*
लोकशाही वार्ता

लोकपाल विधेयकांने काय साध्य होणार?

जिल्हा प्रतिनिधी/ २२ जुलै
              वर्धा : पं. नेहरु प्रणित समाजवादाच्या नावाखाली या देशामध्ये परमीट राज्य आणले.यातूनच मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळल्याने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. याला आळा घालण्यासाठी कायदा करणे महत्वाचे नाही. इतकेच नव्हे तर सध्या गाजत असलेल्या लोकपाल विधेकातूनही हा भ्रष्टाचार संपुष्टात येणार नाही. मग असे विधेयक तयार करून काय साध्य होणार असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी उपस्थित केला. आज वर्धा शहरातील गुजराती भवनात शेतकरी संघटनेच्या वेबसाईटचे उद््घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
              यावेळी उद्घाटक म्हणून दिल्ली येथील जेष्ठ पत्रकार वेदप्रताप वेदीक, अध्यक्षस्थानी प्रा. सुरेश द्वादशीवार तर प्रमुख पाहूणे म्हणून अँड. वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशीकर, शैलेजा देशपांडे, मधुसुधन हरणे, अँड. दिनेश शर्मा, रवी देवांग, अंजना पातुकर व अन्य मान्यवर उपस्थितीत होते. शरद जोशी पुढे म्हणाले, गोखले, न्या. रानडे, टिळक यांच्या काळातील आदर्श आता अस्ताला जात आहे. नेहरुवादी समाजवादाने भ्रष्टाचाराला जन्म दिला. त्याला कायमचा निपटून काढायचा असेल तर राजकीय व्यवस्थेत आमुलाग्र परिवर्तनाची गरज आहे.
              शेतकरी संघटनेने शेतकर्‍यांचे प्रश्न अतिशय गांभिर्याने राज्यकर्त्यांकडे मांडले. हा संपूर्ण इतिहास वेबसाईटच्या माध्यमातून आता जगापर्यंत पोहचणार आहे. ही वेबसाईट शेतकरी संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांनी तयार केली. यामध्ये संघटनेच्या निर्मितीपासूनचा इतिहास व महत्वपूर्ण माहिती उपलब्ध आहे. जेष्ठ पत्रकार वेदीक म्हणाले, राज्यसत्तेने यथा स्थितीवादाला आधार बनवू नये. जनआंदोलनामुळे संपूर्ण जगात राजकीय सत्तेत बदल होत आहे. या आंदोलनांना समाज परिवर्तनाचे आधार असले पाहिजे. राज्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था आपण अजूनही तयार करू शक लो नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. नवे तंत्रज्ञान शेतीला मारक ठरवू नये असेही ते म्हणाले. प्रा. द्वादशीवार यांनी शरद जोशी यांच्या कार्याचा आढावा घेवून ही संघटना बळकट करण्यासाठी नव्या भूमिका जोशी यांच्या नेतृत्वात अजूनही कायम असल्याचे आवर्जुन नमुद केले. यावेळी गंगाधर मुटे यांनी लिहिलेल्या 'वांगे अमर रहे' या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले आहे.
*

Sharad Joshi Nimantran

=====

Farmer Web Site
===== 
कार्यक्रमाला उपस्थितांनी हॉल गच्च भरून गेला होता.

शेतकरी

दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
=====
शेतकरी संघटना

 शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते गोविंद जोशी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले..
=====
कृषी

 माजी आमदार आणि स्वभापच्या अध्यक्षा सौ. सरोज काशीकर यांनी प्रस्ताविक केले.
=====
शरद जोशी

 माजी आमदार आणि स्वभापचे अध्यक्ष अ‍ॅड वामनराव चटप यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
=====
संकेतस्थळ

अ‍ॅड दिनेश शर्मा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
=====
Dinesh Sharma

 मा. वेदप्रताप वैदीक यांनी संकेतस्थळाचे औपचारिक विमोचन केले.
=====
Shetkari Sanghatana

 कार्यक्रमाला उपस्थितांनी हॉल गच्च भरून गेला होता.
=====
Wardha

 मा. वेदप्रताप वैदीक यांनी संकेतस्थळाचे औपचारिक विमोचन केले.
=====
Kisan

 संकेतस्थळाचे अवलोकन करताना मान्यवर.
=====
Wange Amar Rahe

 कार्यक्रमाला उपस्थितांनी हॉल गच्च भरून गेला होता.
=====
Shetkari

 संकेतस्थळाचा संक्षिप्त परिचय करून देताना गंगाधर मुटे.
=====
Gangadhar Mute

संकेतस्थळाचा संक्षिप्त परिचय करून देताना गंगाधर मुटे.
=====
वेदप्रतापजी वैदीक

उद्घाटनपर भाषण करतांना पी.टी.आय या वृत्तसंस्थेचे व नवभारत टाईम्सचे माजी अध्यक्ष मा. वेदप्रतापजी वैदीक.
=====
गंगाधर मुटे

संकेतस्थळाचा संक्षिप्त परिचय करून देताना गंगाधर मुटे.
=====
Sharad Joshi

 गंगाधर मुटे लिखित "वांगे अमर रहे" पुस्तकाचे विमोचन करताना मा. शरद जोशी आणि मान्यवर.
=====
 शरद जोशी

गंगाधर मुटे लिखित "वांगे अमर रहे" पुस्तकाचे विमोचन करताना मा. शरद जोशी आणि मान्यवर.
=====
वांगे अमर रहे

 गंगाधर मुटे लिखित "वांगे अमर रहे" पुस्तकाचे विमोचन करताना मा. शरद जोशी आणि मान्यवर.
=====
शरद जोशी

 शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी मार्गदर्शन करतांना.
=====
संकेतस्थळ

प्रा. पांडुरंग भालशंकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
=====
सुरेशजी व्दादशीवार

 मा. सुरेशजी व्दादशीवार अध्यक्षीय भाषण करतांना.
=====
Womens

 कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली.
=====
Ravi Dewang

 शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवी देवांग यांनी संकेतस्थळाच्या निर्मितीबद्दल गंगाधर मुटे यांचे पुष्पहाराने विशेष अभिनंदन केले.
=====
रवी देवांग

 शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवी देवांग मार्गदर्शन करताना.
=====
शैलजा देशपांडे

 शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ. शैलजा देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
=====
Deshonnati

=====
Wange amar rahe
====
वांगे अमर रहे PDF फ़ाईल स्वरुपात वाचण्यासाठी येथे किंवा मुखपृष्ठावर क्लिक करा.
====

"योद्धा शेतकरी" विमोचन - ABP माझा TV बातमी

Share

प्रतिक्रिया

  • admin's picture
    admin
    सोम, 10/02/2014 - 22:44. वाजता प्रकाशित केले.

    आदरणीय डॉ. मधुकर वाकोडे यांचा अभिप्राय.

    Dr. Madhukar Wakode

  • कॅप्टन Carf's picture
    कॅप्टन Carf
    रवी, 25/05/2014 - 14:03. वाजता प्रकाशित केले.



    दैनिक "प्रहार" मध्ये २ मार्च २०१४ ला श्री रमेश पांचाळ यांनी "वांगे अमर रहे’ पुस्तकाची केलेली समिक्षा 

    शेतकरी जीवनाचा सारिपाट 

    या पुस्तकात २३ लेख असून प्रत्येक लेखाचा केंद्रबिंदू हा शेतकरी समाजच आहे. शेतीसंबंधीची खडान्खडा जाण असल्यामुळेच लेखकाच्या भाषेला एक वेगळीच धार आलेली आहे. शेतक-याच्या आत्महत्या, 
    त्याच्या समस्या, गरजा, राहणीमान, चालीरिती इत्यादीसंबंधी कोणाला अभ्यास 
    करावयाचा असेल, ते खूप उपयुक्त ठरेल, असे आहे.

              ‘अण्णा, कायदा आणि विधेयके आणली म्हणजे प्रश्न चुटकीसरशी सुटतात, असे तुम्हाला वाटत असेल तर मग या वर्ध्याला. हा जिल्हा महात्मा गांधीजींच्या पावन स्पर्शाने पवित्र झाल्यामुळे फार पूर्वीपासून येथे संपूर्ण जिल्हाभर कायदेशीर दारूबंदी आहे. पण याच जिल्ह्यात पावलापावलांवर हवी तेवढी दारू, अगदी कोणत्याही ब्रॅँडची मुबलक उपलब्ध आहे. .. हजारो कार्यकर्त्यांसह या आणि येथे दारूनेच आंघोळ करा. .. कायद्याच्या राज्याचा विजय असो!’
              कायद्याच्या राज्याची हाकाटी मिरवणा-या सरकारला आपल्या स्वार्थाव्यतिरिक्त काहीच दिसत नसते. सामान्य लोकांच्या प्रश्नांशी त्यांचा दुरान्वयानेही संबंध नसतो. याची उद्विग्नता म्हणून ‘वांगे अमर रहे’ या पुस्तकामध्ये लेखक गंगाधर मुटे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेमध्ये ‘आदरणीय शरद जोशी यांना’ हे पुस्तक अर्पण केले आहे. यावरूनच लेखकाची नाळ शेतीशी जोडली गेलेली आहे हे लक्षात येते. शेतीच्या सर्व पिकांविषयी बारीकसारीक गोष्टींचा लेखाजोखा गंगाधर मुटे यांनी या पुस्तकात मांडला आहे. आजचा शेतकरी, सावकारशाही आणि सरकारी अधिकारी यांच्याबद्दल अस्खलित उदाहरणानुसार चित्रण केले आहे.

              पुस्तकाची सुरुवातच ‘शेतकरी पात्रता निकष’ या लेखाने केली आहे. सदर लेखामध्ये, शेती हौसेसाठी करावी की उपजीविकेसाठी? याची चर्चा करताना शेतक-याच्या अंगी लागणारे गुण, कायदेशीर गरजा शेतीसाठी लागणारा पैसा यावर समर्पक भाषेत टीपण केले आहे. शेती हे उपजीविकेचे साधन नाही, अशी कबुली देतो. ‘भारतीय सणांचे अनर्थशास्त्र’ या लेखामध्ये प्रत्येकवेळी ऋण काढून शेतक-याला सण साजरे का करावे लागतात, यासंबंधी बोलताना लेखक म्हणतो. ज्या वेळी शेतीच्या कामाचा जोर असतो त्या वेळीच हे सण येतात; परंतु डिसेंबरनंतर म्हणजे त्याच्या हातात पैसा आल्यावर मात्र एकही असा सण नाही की, तिथे पैसा खर्च करावा लागतो. मग शेतकरी नव्याने शेतीसाठी ऋण काढतो. शेतकरी कायम कर्जबाजारी राहावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच सणांची निर्मिती पुराणकाळापासून झाली असावी, असे लेखकाला वाटते.

              ‘वांगे अमर रहे’ या लेखामध्ये जास्त पीक घेतले, तर शेतक-याला हाती पूर्णपणे घाटा कसा येतो याचे वास्तव मांडले आहे. महाराष्ट्र सरकारचे कृषिनिष्ठ, शेतीभूषण शेतकरी पुरस्कार कसे कपोलकल्पित थोतांड असते, सरकारी अधिकारी आणि राजकीय पुढा-यांना हाताशी धरून असे पुरस्कार मिळवणारी माणसे खूप आहेत, असे लेखकाने ‘कुऱ्हाडीचा दांडा’ या लेखामध्ये सांगितले आहे.

              ‘शिक्षणाने विद्या आली’ विद्येमुळे मतीही आली. पण मतीमुळे नीती येण्याऐवजी थेट गती आणि वित्त आले की लढण्याचे सामर्थ्यही आपोआपच येईल, असा जोतीबांनी केलेला कयासही शेतकरीपुत्रांनी-शुद्रपुत्रांनी उताणा-उघडा-तोंडघशी पाडला, असे समाजव्यवस्थेसंबंधी परखड लेखकाने मत मांडले आहे. शेतकरी महिलांच्या व्यथा ‘भोंडला, हादगा, भुलाबाईची गाणी’ या लेखामध्ये समर्पक गीतांद्वारे सहज उलगडून दाखवल्या आहेत.

              ‘शेतक-यांना फुकट काही देऊ नये’ अशा आशयाचे विधान पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी २०११ मध्ये केले होते. त्यांच्या मताचा समाचार घेताना लेखक म्हणतात, ‘स्वत:च्या शेतीत किंवा विद्यापीठाच्या शेतीत ज्यांना कधी एकरी १५ क्विंटल सोयाबिन पिकवून दाखवता आला नाही, ते स्वत: शेतीतज्ज्ञ म्हणून मिरवत असतात.’ ख-या अर्थाने आज विद्यापीठीय शेतीसंशोधक आणि प्रत्यक्ष शेती यांचा काहीही संबंध राहिलेला नाही, हेच लेखकाने अधोरेखित केले आहे. शेतक-यांच्या समस्यांची जाण बिगरशेतकरी शहरी माणसाला व्हावी, या उद्देशाने एखादे ‘साप्ताहिक’ सुरू करण्यासाठीसुद्धा किती हाल सोसावे लागतात यासंबंधीचे वर्णन ‘वर्धापनदिनाच्या निमित्ताने’ या लेखात केलेले आहे.
              सरकार हे शेतक-यांचे मायबाप असते, मात्र शेतमालाला कमी भाव मिळण्याचे कारण व्यापारी असून तेच शेतकऱ्यांना लुबाडतात, असा सार्वत्रिक समज होता; परंतु शेतक-याने मरण हेच सरकारचे अधिकृत धोरण असते, शेतीमालाला त्याचा उत्पादन खर्च भरून निघणार नाही एवढे कमी भाव देण्यासाठी सरकार नानाविध क्लृप्त्या वापरून शेतीमालाचे भाव नियंत्रित करते, या शरद जोशींच्या परखड विचाराने लेखक प्रभावित झाले असल्याचे ‘कापसाची दशा, दिशा आणि दुर्दशा’ या लेखात जाणवते.

              सदर पुस्तकामध्ये एकूण २३ लेख असून प्रत्येक लेखाचा केंद्रबिंदू हा शेतकरी समाजच आहे. शेतीसंबंधीची खडान्खडा जाण असल्यामुळेच लेखकाच्या भाषेला एक वेगळीच धार आलेली आहे. शेतक-याच्या आत्महत्या, त्याच्या समस्या, गरजा, राहणीमान, चालीरिती इत्यादीसंबंधी कोणाला अभ्यास करावयाचा असेल, तर हे पुस्तक म्हणजे मैलाचा दगड आहे, यात शंका नाही.

    वांगे अमर रहे : गंगाधर मुटे
    जनशक्ती वाचक चळवळ
    पानं : १२७, मूल्य : १३० रुपये
    Prahar
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  • पाने