नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी बाप
नाही वाटत मला दुष्काळाची भीती
नाही जाऊ देणार वाया माझी मायसखी
जे होते ते होऊन गेले,
कोणी कर्जाने तर कोणी काळजीने मेले
राब राब राबला घाम त्यानं गाळला
कारे सरकारा तु असा खेळ मांडला
कष्ट गेलं वाहुनं ,शेवटी तो उपाशीच मेला
माझा बाबा मला सोडूनी गेला
बाबा गेल्यापासून गेली माझी झोप
चार चौघानं आश्वासन देऊन केलं मला गप
चावत नाही उंदीर अन् चावत नाही साप
त्या मुक्या जनावरांना कळलं,सोडून गेला मला माझा बाप
कर्जाची चिंता अन् त्यात भाव नाही मालाला
काडी मात्र किंमत नाही शेतकऱ्याच्या कष्टाला
एकच मागणं हात जोडून तुम्हाला
पैसा नको फुकटचा , दाम द्या कष्टाला
मोल बाबाच्या कष्टाचे सरकार विसरले
शेतीमालाचे भाव बाजारात घसरले
आमच्यासारखे लाखो शेतकरी मातीत मिसळले
या सरकारने गरिबाला लुटले
या सरकारने गरिबाला लुटले
नाव -निर्मळ वैष्णवी नानासाहेब
तिसरे वर्ष फार्मसी (विद्यार्थिनी)
८४४६०४६७२८
प्रतिक्रिया
कष्टकरी जीवाप्रती अंतरीचा भाव
कष्टकरी जीवाप्रती अंतरीचा भाव
पाने