
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
हमी भाव
कुणी, हमी भाव देता का रे? हमी भाव ?
एका शेतक-याला ,शेती करणा-याला कुणी भाव देता का?
एक शेतकरी ,शेती वाचून,
पिका वाचून,
साहेबाच्या माये वाचून,
देवाच्या दये वाचून,
रानावनात हिंडत आहे.
जिथुन कोणी भाव हिसकावुन घेणार नाही,
अशी मार्केट ढूंढत आहे,
कुणी, हमी भाव देता का रे? हमी भाव ?
काय रे बाळा, खरच सांगतो बाबांनो
कास्तकार आता थकून गेलाय,
घरातल्या समस्या , जबाबदारीत
अर्ध-अधिक तुटून गेलाय,
सारी भिस्त पिकावरती,
लहरी निसर्गासोबत ,
झेप झुंज घेऊन घेऊन,
कास्तकार आता थकलाय.
जळके तूटके पंख हालवित,
खुरडत खुरडत उडत आहे,
खर सांगतो बाबांनो,
कास्तकाराला सरकारचं नडतेय रे,
हे.. बाबा.. कुणी हमी भाव देता का रे? हमी भाव ?
कास्तकाराला महाल नको,
राजवाड्याचा सेट नको,
पदवी नको, हार नको,
थैली मधली भेट नको,
हवे हक्काचे दाम ..
बाराही महिने संसार चालवण्यासाठी,
नक्की हवा हमी भाव ,कष्टाचे चिज होण्यासाठी ..
कास्तकाराला जगण्यासाठी,
फक्त हवय शेतमालाला हमी भाव
लहान लहान लेकरं अन बायकोसाठी .
कुणी हमी भाव देता का रे? हमी भाव ?
श्याम ठक
बार्शीटाकळी जि . अकोला
९९७५७९२५२०
Comments
अतिथी सदस्य या आय डी ने
अतिथी सदस्य या आय डी ने प्रकाशित झालेली प्रवेशिका पात्र ठरणार नाही
१ . ज्यांनी अजूनही बळीराजावर सदस्यत्व घेऊन आय डी तयार केलेली नाही त्यांनी सदस्यत्व घेऊन आय डी तयार करून मला कळवावे. त्यानंतरच पुढील प्रोसेस होईल.
२. ज्यांनी प्रवेशिका प्रकाशित केल्या आहे पण लेखक म्हणून अतिथी सदस्य (-) आले आहे त्यांनी मला प्रवेशिकेचे शीर्षक आणि आपला आय डी कळवावा.
- गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे अतिथी सदस्य म्हणून सादर केलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरता येणार नाही. लॉगिन करून सादर केलेल्या फक्त प्रवेशिका पात्र ठरतील.
या संबंधात वारंवार सूचना देऊनही आपण दखल घेतलेली नाही.
आज 30 सप्टेंबर रोजी तशी सुधारणा झाली नाही तर सदर प्रवेशिका डिलीट करण्यात येईल, कृपया नोंद घ्यावी.
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे अतिथी सदस्य म्हणून सादर केलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरता येणार नाही. लॉगिन करून सादर केलेल्या फक्त प्रवेशिका पात्र ठरतील.
या संबंधात वारंवार सूचना देऊनही आपण दखल घेतलेली नाही.
त्यामुळे नाईलाजाने सदर प्रवेशिका स्पर्धेतून बाद करून निमंत्रितांचे लेखन या विभागात हलवली आहे, कृपया नोंद घ्यावी.
शेतकरी तितुका एक एक!
कवी श्याम ठक यांची हमी भाव..
कवी श्याम ठक यांची हमी भाव.. उत्तम कविता
Pages
आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
Pages
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
Pages
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
There is currently 1 user online.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण