नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बळीराजा (अष्टाक्षरी काव्य ).
बळीराजा वेडापिसा l
झालास का रे तू असा llध्रुll
तू जगाचा पोशिंदा l
कष्ट कर तू यंदा ll
नांगरन कर शेती l
पलटी होईल माती ll
कष्टाचा घे तू वसा ll१ll l
पाऊस जेव्हा येईलl
माती सुगंधी होईल ll
कर पेरणी शेतात l
स्प्रे पंप घे हातात ll
फवारणी कर असा ll२ll
पाऊस असे लहरी l
कमर मोडे मजुरीll
पिके ढगाकडे पाहीl
पाऊस येतच नाही l
चिंतेतच तु रे कसा ll ३ll
पिक येईल चांगले l
रक्षण पाहिजे केले ll
पिकेल पांढरं सोनं l
पक्षीही गाईल गाणं ll
भरेल तुझाही खिसा ll ४ll
ऊन वारा पावसाचीl
तमा तू न बाळगाची ll
कर्म असे ईश्वर l
तू तयाची पूजा कर ll
सोडू नको तुझा वसा ll ५ll
बळीराजा वेडापिसा l
झालास का रे तू असाl
झालास का रे तू असाll.
रचना---विनायक अंगाईतकर
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.
पाने