नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ह्या कवितेच (आ)जन्मस्थळ म्हणजे आमचा धंदा-भिक्षुकी उर्फ भटजीगिरी...विशेषतः श्रावण ते (नाकी)नवरात्र या कालावधीत आंम्हा भटजींवर या खिचडीचा जो मारा होतो,त्या---होय...होय..त्याच वेदनेतुन ही कविता प्रसवली आहे...म्हणजे हीचं आमच काही वैर नाही,पण,''त्रास होतो हो हीचा(म्हणजे खिचडीचा )''...असं प्रामाणीक पणे सांगूनही,,,नाही नाही गुरुजी आंम्हाला बंरं वाटावं म्हणुन खा...खा...खा...अंसं काखा वर करुन ठ्ठो ठ्ठो ठ्ठो करत कस्टमर सॉरी सॉरी यजमान मागे लागतात...आणी आंम्हाला कारणं देता देता पळता भुई थोडी होते,,,एरवी ही बया आंम्हाला अवडत नाही असं कुठाय?मी तर माझ्या या मुळातल्या प्राणप्रीय परंतु अतीपरीचयात अवज्ञा झालेल्या या खिचडीला पहीली सलामी एका श्लोकाच्या ओळीच्या विडंबनातूनच दिली होती-म्हणजे,,, ''विश्वाधारं गगन सद्रुशं मेघवर्णं शुभांगम'' असं आहे की नाई,त्याला ''साबुदाणं रबर सद्रुशं श्वेतवर्णं च्युईंगम''...असं मी चावलं होतं ...असो अता जास्त च्यावच्याव न करता उरलेलं कवीतेवर सोडतो---तर श्रोतेहो खिचडी करीता वाहातो,ही शब्दांची खिचडी....................(ही आमची पारंपारीक-गुरुजी/यजमान म्याच आहे.)
यजमानांनी विचारलं-उपास...?
जरा खिचडी देऊ का?
चपला घालतच म्हणालो
त्या पेक्षा मी येऊ का?
का हो?तुंम्ही गुरुजी..
आणी खिचडीला भिता?
अहो,वाचायला फार सोपी
ही पचायला अवघड गीता
अहो,मस्त दही टाका
मजबुत दाबून हाणा..
म्हणजे नंतर सहा तास
पोटात गोळे आणा?
जुने गुरुजी मजबुत खायचे...
एक/दोन प्लेट?...विसरा
पूर्वीच्यांना उद्योग ठेवलावतात का
खाण्यापलीकडे...दुसरा?
पूर्वीचे गुरुजी कामं करुन
पराती करायचे फस्त
अहो,जुना स्कुटरचा काळ तो
एव्हरेज पेक्षा इंधन जास्त
जाउ दे गुरुजी आता..
राग विसरा..हट्ट सोडा
कालची खिचडी पचायला
आधी आणा १ सोडा
अशा तह्रेनी आंम्ही यजमानांचा
१प्लेट अपराध पोटात घातला
पण नंतर दिवसभर...
तो आमच्या पोटात उतला
श्रावणाचा संपत सोमवार
आंम्ही या खिचडीवर सोडला
आणी यजमान/गुरुजी नववादाचा
अजुन एक नारळ फोडला.....
प्रतिक्रिया
छान झाली खिचडीची कविता.
छान झाली खिचडीची कविता.
शेतकरी तितुका एक एक!
पाने