नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मृत्युपत्र
निघालो डोळे मिटून
रात्रीच्या गर्द अंधारात
नको शेतकऱ्याचा जन्म पुन्हा
लिहून ठेवले मृत्युपत्रात ||धृ||
शेतकरी बाप माझा
गहाण ठेवून सारं शेत
लढला अन्याया विरुद्ध
शेवटी मिळालं फक्त त्यांचं प्रेत ||१||
टिळा मातीचा लावून
घेतली शपथ मिळवीन शेत
झिजून सरले आयुष्य
कष्टाने मिळाले थोडेच शेत ||२||
मोडलेला संसार कसातरी
टेकू देवून मी उभा केला
उपाशी पोटी पिकवलं शिवार
कवडी दमडी भाव मिळाला ||३||
वाट बघतील घरी लेकरं
पत्र नाही उरली खाऊ घेण्याची
नशिबी त्यांच्या आजही भाकर कालची
बघताना काहीली होईल जीवाची ||४||
असं जगण्यापेक्षा मेललं बरं
सरकार मेल्यावर लाखभर देतं
असाच निघालो घेवून दोर
मिळेल तुम्हाला माझे मृत्युपत्र अन् प्रेत ||५||
पंडित निंबाळकर
मु पो सांगवी भुसार
ता कोपरगाव जि अहमदनगर
7972523717
प्रतिक्रिया
छान रचना सर जी.
छान रचना सर जी.
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने