नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
व्यवसाय हा कृषीचा झाला जुगार आहे.
झाली असून मोडी पेरा दुबार आहे.
हा कोणत्या तऱ्हेचा सांगा उतार आहे.
मी फेडतो तरीही वाढत उधार आहे.
कृषिकर्म एक हुकमी पत्ता असून देखील,
खेळात मिळकतीच्या त्याचीच हार आहे!
मरण्याशिवाय नाही पर्याय कोणताही,
जगण्यास पण तरी मी करतो पुकार आहे.
सर्वत्र इंडियाचे प्राबल्य आज असुनी,
अस्तित्व भारताचे देशात ठार आहे.
घाट्यात कास्तकारी गेली तरी इथे या,
खात्यात शेतकीच्या भारी पगार आहे.
सांगा करू कुणाच्या खर्चात मी कटौती,
शेतीस लावले तर पोटास मार आहे.
होणार पण कशी या देशात कर्जमाफी?
बहुतेक राज्यकर्ते जर सावकार आहे!
द्या रास्त दर, हमेशा हे सांगतो 'धिरज' मी,
पण घेत कोण येथे माझा विचार आहे!
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद! सर.
आभार आपले!
जबरदस्त भाऊ
एकदम मस्त
Dr. Ravipal Bharshankar
खूप खूप धन्यवाद! डॉ. साहेब
आभार आपले डॉ. साहेब!!!!!
गझल :अस्तित्व भारताचे
गझल ...अप्रतिम सर
भेटूयात पुन्हा
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
धन्यवाद! रविंद्र सर.
आपला आभारी आहे!!!!
धिरज गुरु. सुंदर रचना.
क्या बात है.अप्रतिम.
Narendra Gandhare
धन्यवाद! गंधारे सर!!
आपले खूप खूप आभार नरेंद्रभाऊ !!!!!!
गुरूजी मस्त
ताकसांडे सर खुपच सुंदर
धन्यवाद!
महात्माजी आपली कृपा...
पाने