नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गझल : उद्योग हिरवळीचा
देशात जर कृषीचा या होत घात आहे.
सरकारचा सरळ मग याच्यात हात आहे.
दररोज घोषणांच्या देतात भुलथापा,
असल्या छळात मी हा येथे रहात आहे.
वर्षानुवर्ष करुनी ऊद्योग हिरवळीचा,
आल्हाद-पण न येणे ही काय बात आहे?
मी न्याय मागुनी पण ऐकत कुणीच नाही,
अन्याय मजवरी हा का होत जात आहे?
जिंकायलाच सारे असतात खेळ खेळत,
पण हारणे नशीबी हेही जगात आहे !
झाले निदान तर मग उपचार कर म्हणावे,
आजार काय हा हो मज जन्मजात आहे?
खाणार काय सांगा शेती करून माती?
विळख्यात जर ऋणाच्या आयुष्य जात आहे!
तोडून पाश सारे होणार मोकळा मी,
इतकी जरूर ताकत या मनगटात आहे.
शेती शिवाय मजला काहीच येत नाही,
शेतीच करत माझी गेली हयात आहै.
या जीवनात नाही विझणार मी कधीही,
जळणे 'प्रदीप' माझ्या नावा-रूपात आहे!
प्रदीप थूल हिंगणघाट जि.वर्धा
प्रतिक्रिया
जबरदस्त गझल '' गांधीजी ''
जबरदस्त गझल '' गांधीजी ''
तोडून पाश सारे होणार मोकळा मी
इतकी जरुर ताकत या मनगटात आहे.
बढिया!!!
सुंदर गझल
प्रदीप भाऊ मस्त
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद
आभारी आहे डाॅ साहेब
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण