नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
फास
चुकलेले रस्ते
दुभंगलेली स्वप्ने
आकसलेली नाती
भेगाडलेली माती
उगवेल का सांगा ?
दारी सावकाराच्या रांगा
कोंडला माझा श्वास
पळाला तोंडचा घास
नकोसा झाला त्रास
म्हणून घेतो आता फास ||धृ ||
जवानीची मस्ती
बापाची होती धास्ती
परीवर जीव जडला
सोईर संबंध घडला
घरचे झाले थोडे
व्याह्याने धाडले घोडे
कमव आता तिच्यासाठी
पोटातल्या लेकरासाठी
गाव म्हणजे वाडी
शेती होती थोडी
गहाण ठेवली गाडी
मिळेना गवताची काडी
मरतूकडी माझी बैलजोडी
भेगाडलेल रान
तयार केल छान
पाऊस ना पाणी
सोबत होती राणी
महाग झाले बियाणे
गहाण ठेवले दागिने
सरले पावसाचे महिने
अवघड झाले जगणे
काळजीन माय आजारी
तर बाप झाला जुगारी
बायको माझी भोळी
म्हणे अर्धी खाऊ पोळी
तीची फाटकी साडी चोळी
लोक नजरेनं काळी
जिवापेक्षा इज्जत प्यारी
सरकारची योजना भारी
कंटाळून जे घेतील फास
घरी देवू लाखाचा पास
म्हणून सरणावर माझ्या
भाजेल त्यांची पोळी
जिवाची माझ्या
पेटेल तेव्हा होळी
संपेल आता वनवास
म्हणून घेतो आता फास
पंडित निंबाळकर
अहमदनगर
7972523717
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने