नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
धोरण
नशिबात आहे बा च्या
काळी ढेकळं ढेकळं
कधी मिळेल बापा
माझ्या कष्टाची भाकर
किती कष्ट केले रानी
स्वप्न सजवूनी मनी
घास हिरावतो तोंडातून
कसा रे हा पाणी
बिज निघेल हे कसं
नाही राहीला भरवसा
जुगार खेळून शेतीचा
झाला रिकामा हा खिसा
बाप थकला रे माझा
भार कर्जाचा पेलून
गळ्या आवरतो दोर
झाडावर झुलून
असं आलं ते हिरवं
कर्जमाफीचं गाजर
आशा प्रफुल्लीत झाल्या
आली आडवी माजर
कुठं गेले ते कैवारी
कुठं चाललं धोरण
पट्टी बांधूनी डोळ्या बघता
माझ्या बापाचं मरण
- रंगनाथ तालवटकर
चिखली (कोरा)
त. समुद्रपूर जि.वर्धा
७३८७४३९३१२
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
खुप छान! तालवटकरजी
धन्यवाद
धन्यवाद
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने