नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*सासर माहेर* इव्हायाले जव्हापासून घेतला जवायापेक्षा भारी आहेर तवापासून सासरचं झालंय बाई माह्या लेकीच्यासाठी माहेर .
राखला ईहिणीचा मान देऊन लुगडं अन चोळीचा खण ;सासू हरवली तिच्यातली जागल भोळ्या मायचं मन .
भाऊ जावयाचा ग भोळा त्याले पुकार फक्त दादा अन भाऊ ; लाजून बोलला वहिणीपाशी तुया पसंतीची आणजो जाऊ .
येता नणंद माहेराला धावून दे फक्त तांब्याभर पाणी ; भोळी हसून म्हणते, 'गुणी मांज्या भावाची ग राणी.
लावता जावायाच ताट , नको ऊण दुण अन चहाडी ; हसून म्हणतात मग सारे ती राजाराणीची हो जोडी.
आला आला तेरावा महिना त्याले धोंड्याचा अस नाव लेक राणीसारखी नांदते सासरी, सांगतो सारा गाव .
किरण शिवहर डोंगरदिवे।
समता नगर मेहकर।
ता मेहकर जि बुलडाणा
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने