

तुझी गरज आहे
खरचं बळीराजा.......
आज तुझं आभाळ
सगळीकडून फाटत चाललंय
तुझ्या जगण्यावर
मळभ दाटत चाललंय
दरवर्षी वाटतं यंदाच
सालमान बरं जाईल
पीकपाणी चांगल होऊन
सारं काही ठीक होईल
पण नेहमीच तुझ्यावर
कोणतही विघ्नं येतं
तोंडाशी आलेला घास
हिरावून नेतं
तुझा सरकारी मदतीचा
चेक आलाच नाही
अन तुझा सातबाराही
कोरा झालाच नाही
नापिकी अन कर्जबाजारीपणाचा
सहन होत नाही तुला त्रास
आणि दिसतोय तुला फक्त
डोळयासमोर गळफास
खरचं नशिबाचे भोग
कधी मिटत नाहीत
पण लक्षात घे आत्महत्येने
प्रश्न सुटत नाहीत
पण थांब बळीराजा थोडे
आवळू नको गळा दोर
तु गेल्यावर या मातीत
उघड्यावर पडतील तुझी पोरं
उमेदीनं उभा रहा
ही एक अरज आहे
तुझ्या पोरांना अन देशाला
तुझी गरज आहे.
-सिद्धेश्वर इंगोले.
9561204691