![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
तु जान माणसा, सुजान मानसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा ||धृ||
शेतकऱ्याची बैलगाडी
लुळी- पांगळी झाली
वादळ वारा काळ पेटला
कोणी नाही वाली
अश्रृ ढाळतो शेतकरी, दया न माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा ||१||
खेळ मांडुनी क्लृप्त्यांचा
करणी केली मोठी
पांढरपेश्या कावळ्यांनी
धरणी केली खोटी
अन्यायाने घोट घेतला, छान माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा ||२||
लय वज केली मातीची
छातीला लावुनं
आयुष्याची माती झाली
शेतीला वाहूनं
शेतक-यांची सुळावरती, माण माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा ||३||
शेतकऱ्यांच्या कामकऱ्यांच्या
घामाचे खाऊनं
मातीला ही विसरूण गेले
ए सी तं राहूणं
शेतक-यांचे नाही कुणाला, भान माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा ||४||
भूमातेच्या पदरी केली
शेती लाजवंती
ओठ आपले हाय म्हणावे
आपल्याच दंती
शेतक-यांनी काय करावे, दान माणसा?
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा ||५||
डॉ. रविपाल भारशंकर
प्रतिक्रिया
तु जान माणसा, सुजान माणसा!
अप्रतिम गीतरचना डॉ. साहेब!
Pradip
धन्यवाद
आभार प्रदीप भाऊ!
Dr. Ravipal Bharshankar
तु जान माणसा, सुजान माणसा!
जबरदस्त काका..
Aryan Bharshankar
धन्यवाद!
आर्यन!
Dr. Ravipal Bharshankar
पाने