नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी मर्दानी...!
काठी न घोंगडं घेऊ द्या की रं,
मलाबी रस्त्यावर येऊ द्या की .......!
या सरकारला आलीया मस्ती
कसे चाकर मानेवर बसती
ही विलासी ऐद्यांची वस्ती
लावती घामाला किंमत सस्ती
त्वेषाने अंबर चिरू द्या की रं ......!
ही सान-सान शेतकरी पोरं
ह्यांच्या बाहूत महाबली जोर
वाघा-छाव्यांची यांची ऊरं
घेती लढ्याची खांदी धुरं,
हातात रूमनं घेऊ द्या की रं ......!
हे फौलादी शेतकरी वीरं,
तळहातात यांचे शिरं,
लढायला होती म्होरं
मग येई सुखाची भोरं
धरणीचं पांग फेडू द्या की रं ......!
ही विक्राळ शेतकरी राणी
नाही गाणार रडकी गाणी
ही महामाया वीरांगनी
अभय गर्जेल शूर मर्दानी
उषेला बांग देऊ द्या की रं ......!
गंगाधर मुटे
....................................................................
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
....................................................................
प्रतिक्रिया
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/2153287718029238
शेतकरी तितुका एक एक!
शरद जोशींचा उल्लेख
हे गीत मी १९९४ च्या सुमारास युगात्मा शरद जोशींच्या नेतृत्वाखालील एका रॅलीत सादर करण्यासाठी वेळेवर रचून सादर केले होते.
या गीतात युगात्मा शरद जोशींचा उल्लेख होता पण त्यांनी मला फाटकारून ते कडवे वगळायला भाग पाडले.
शेतकरी तितुका एक एक!
पाने