![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कशी म्हणावीत गाणी
ओले मेघ पांघरले, झाली कासावीस भूमी
नाही पाऊस ना पाणी, कशी म्हणावीत गाणी ?
झाली पेरण रानात, दुःख हिरवे पानात
मातीतून उगवले , खोल रुजले मनात
तुझे - माझे स्नेहबंध, का तोडावेत कोणी ?
कळ दाटली काळजात, मूळ उघडे गं झाले
माझ्या भाळावर कुंकू, रित्या हातानं मी ल्याले
दारी बांधले तोरण, सडा रांगोळी अंगणी ...
सांगू नको तुझे काही, सुख मागू नको मला
आज आलेला बहरात, उभा शिवार वाळला
दारी तुळस लावून, किती पुजावीस आणि ...
नभी कडाडली वीज, उरी कल्लोळ माजला
तन - मन पेटलेले, नाही विझवून गेला
दूर शिवारी भेटला, क्षितिजाच्याआड धनी ...
- मुक्तविहारी
परळी वैजनाथ.
प्रतिक्रिया
कशी म्हणावीत गाणी
सांगू नको तुझे काही, सुख मागू नको मला
आज आलेला बहरात, उभा शिवार वाळला
दारी तुळस लावून, किती पुजाविस आणि.....
अप्रतिम.....
धन्यवाद
धन्यवाद ताकसांडे सर !
मुक्तविहारी
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद
धन्यवाद मुटे सर
मुक्तविहारी
अतिशय छान कविता
अतिशय छान कविता ,मुक्तविहारीजी अभिनंदन .
पाने