![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मानू दुःखालाच सुख
जगण्याची इच्छा असूनही
आता जगता येत नाही
आयुष्य हे आनंदाने
अनुभवता येत नाही
काळी आई धरणी माता
आमचे पोषण करते
शेतकर्यांच्या आयुष्याचे
सरकार शोषण करते
पिळवणूक होत आहे
कष्टकरी या शेतकर्यांची
आत्महत्या जाहली हो
स्वाभिमानी नि खऱ्यांची
सावकारी कर्ज घेऊन
पेरले रे सारे रान
खतपाणी फवारणीही
केली आनंदानं त्यानं
पीक डोलू लागे हिरव्या रानी
उधानलं मन बघा कसं
सुख समाधान फार मोठं
प्रफुल्लित झालं जीवन असं
अवकाळी पावसाने ऐनवेळी
केली दाणादाण आणि गारपीट
शेतकर्यांच्या आयुष्याचे ध्येय
आता उरले नाही नीट
कधी दुष्काळाच्या झळा
भाळी असे रखरख
नको आत्महत्या तरी आता
मानू दुःखालाच सुख !
- मुक्तविहारी,
क्वार्टर क्र. जुने डी ८, थर्मल काॅलनी,
परळी वैजनाथ, जि. बीड.
मो. ९८६०९८५९११
ईमेल : muktvihari@gmail.com
प्रतिक्रिया
छान
खुप छान कविता
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद
भारशंकर सर, मुटे सर आपले मनःपूर्वक धन्यवाद.
मुक्तविहारी
मानू दुःखालाच सुख
दोन्ही छान कविता आहे.... सर
नको आत्महत्या तरी आता
मानू दुःखालाच सुख...
कविता
धन्यवाद
ताकसांडे सर, जाधव सर मनःपूर्वक धन्यवाद !
मुक्तविहारी
पाने