![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
दुखणे जरी पुराणे,ही कळ नवीन आहे
दररोजच्या उन्हाची,ही झळ नवीन आहे
शेतात राबणारा शब्दात मांडतो मी
किस्सा जरी जुना हा तळमळ नवीन आहे
नोव्हेच आत्महत्या गळफास ही नव्हे हा
झाडास लागलेले हे फळ नवीन आहे
फसशील रे पुन्हा तू ऐकूण गोड बाता
माशास पकडणारा हा गळ नवीन आहे
सरकार शेटजीचे शेती विकास गाते
वाघास सावजाची,कळकळ नवीन आहे
खाऊन फस्त केले शेतास कुंपनाने
गावात या लुटीची हळहळ नवीन आहे
थाकलो जरा आता मी देहात त्राण नाही
उसनेच आनलेले हे बळ नवीन आहे
तोडून बंध सारे घे उंच तू भरारी
रक्तात आज मर्दा सळसळ नवीन आहे
सोडून दे आता तू हे राबणे फुकाचे
जाऊ तिथे जिथे रे दरवळ नवीन आहे
- आत्माराम जाधव
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

शेतकरी तितुका एक एक!
पाने