विठ्ठलभक्ती
सकाळच्या पारी, हाक मारीत आला वाणी,
विठ्ठू जनीच, भरी पाणी.
सकाळच्या पारी, हाक मारीत आला माळी,
विठ्ठू जनीच, पीठ चाळी.
सकाळच्या पारी, हाक मारीत आला वाणी,
विठ्ठू जनीला, घाली पाणी .
सकाळच्या पारी, दार उघडितो दोन्ही फळ्या,
दारा समोर तुळशीच्या, विठ्ठू तोडीतो होता कळ्या.
सकाळच्या पारी, जनी म्हनीती भजन,
चंद्रभागेच्या पाण्यानं, रोज भरीते रांजण.
-----------------------------------------------------------