पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
(१९८५ मध्ये मी लिहिलेली माझी पहिली कविता.) बरं झाल देवा बाप्पा...!! सरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले बरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले ....॥धृ.॥
कर्ज ठेवून आजा मेला, कशी ही कसोटी कर्जफ़ेडीपायी जगला बाप अर्धपोटी तरी नाही ऐसेकैसे कर्जपाणी फ़िटले ....॥१॥
कधी चालुनिया येते कहर अस्मानी विपरीत शेतीधोरण कधी सुलतानी कमी दाम देवुनिया, शेतीमाल लुटले ....॥२॥
इंडियाचे राज्य आले, इंग्रजाचे गेले शोषणाने शेतकरी खंगुनिया मेले पोशिंद्याच्या मुक्तीसाठी रान सारे पेटले ....॥३॥
गंगाधर मुटे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 4 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.