![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
धावपट्टी-2
-------------
बेवफा सत्तेशी पुन्हा कट्टी झाली
शेती माझी मग धावपट्टी झाली
रेसच्या घोषणेने एकच धूम उडाली
माझी बैलगाडी मीही दुरूस्त केली
विमानांशी होती टक्कर थेट कासवांची
विश्वासाने चमकत फौज काजव्यांची
धावण्यास विमान भलतेच आतूर होते
शक्तीनिशी ते भरभक्कम तयार होते
पिस्टन इंजिन आणि पंखे तुफान होते
हवेस चिरणारे वेगाचे उडान होते
पावेल,टायसन,बेल्ट आणिक उसेन बोल्ट
सारेच कसलेले ते हुकमाचे पायलट
कळेल ' ना' कुणाही अशीच 'रेस'होती
आगळी वेगळी यमाचीच पेशकश होती
विमानांनी कासवांना पटकून दिली मात
वरून 'कोरोनाही' लावून गेला वाट
(माझी ही 'कविता'शेतकऱ्याची हतबल परिस्थिती, त्यातून सत्तेशी निर्माण झालेला वैचारिक संघर्ष व मनोरंजन यांचा मेळ आहे.
सत्तेशी आमने-सामने लढाई असा अर्थ लावू नये.)
--राजेश जौंजाळ
पोहणा(हिंगणघाट)
जि.वर्धा
*********************************
प्रतिक्रिया
व्वा मस्त
बढिया राजेश भाऊ
धन्यवाद प्रदिप सर.
धन्यवाद प्रदिप सर.
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने