नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*खाज...*
दिवसभराचे सोसत चटके
अंगावरती आसूड फटके
ढेकूळ ढेकूळ उकलताना
दबल्या दाण्यात हासू लटके...
आभाळ झुलवी झुला कोरडा
आषाढ घाली पेरणीस मोढा
उंडरणाऱ्या वासरांच्याही
शेपटींचा मग पडतो गोंडा...
झुलता श्रावण सोडतो लाज
बैलपोळ्याचा उतरता साज
जगण्यासाठी उधारी सारी
मरण मांडते वाढीव व्याज...
सोसण्यालाही चढवी साज
पेलते माती कोणते राज?
सरत्या सांजेच्या तळहातावर
उगत्या सूर्याची सुटते खाज...
-*रावसाहेब जाधव(चांदवड)*
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद!
धन्यवाद सर!
रावसाहेब जाधव (चांदवड)
पाने